अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सप्टेंबर 2022 या एकाच महिन्यात एकूण 1,47,686 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन


सलग सात महिने मासिक जीएसटी महसूल, 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक

सप्टेंबर 2022 साठीचे  महसूल संकलन, 2021 सप्टेंबरच्या जीएसटी महसुलाच्या तुलनेत 26 टक्के अधिक

30 सप्टेंबरपर्यंत एकूण 1.1 कोटी ई-वे बिल्स आणि ई-इनव्हॉईसेस (72.94 लाख ई-इनव्हॉईसेस आणि 37.74 लाख ई-वे बिल्स) या महिन्यात काहीही अडथळे न येता निर्माण करत, जीएसटी पोर्टलने केला नवा विक्रम

Posted On: 01 OCT 2022 12:59PM by PIB Mumbai

 

सप्टेंबर 2022 ह्या एकाच महिन्यात, देशांत एकूण जीएसटी महसूल संकलन, 1,47,686 कोटी इतके झाले असून, त्यात सीजीएसटी ( केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) संकलन 25,271 कोटी रुपये तर एसजीएसटी (राज्य वस्तू आणि सेवा कर) संकलन 31,813 कोटी रुपये इतके आहे. तर आयजीएसटी 80,464 कोटी रुपये आहे. ( यात, 41,215 कोटी रुपये मालाच्या आयातीवरील शुल्काचाही समावेश) आणि उपकर म्हणजे सेस- 10,137 कोटी रुपये इतका आहे (यातही मालाच्या आयातीवरील 856 कोटी रुपयांच्या उपकराचा समावेश आहे.)

सरकारने नियमित समझोत्याच्या आधारावर, आयजीएसटी मधून 31,880 कोटी, सीजीएसटी तर, 27,403 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून धरले आहेत. या दोन्ही विभाजनानंतर, केंद्र आणि राज्य सरकारांचे सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलन, 57,151(CGST) आणि 59,216 (SGST) इतके आहे.

सप्टेंबर 2022 मधील महसूल संकलन, गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील जीएसटी महसूल  संकलनाच्या तुलनेत, 26 टक्के अधिक आहे.  या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल, गेल्यावर्षीच्या तुलनेत, 39% अधिक होता. तर, देशांतर्गत व्यवहारातून संकलित झालेला महसूल गेल्यावर्षी पेक्षा, 22%  अधिक होता. 

जीएसटी संकलन सातत्याने, अधिक असण्याचा हा आठवा महिना असून, गेले सलग सात महीने, जीएसटी महसूल संकलन, 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून, सप्टेंबर 2022 पर्यंत, जीएसटी संकलनात, 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट, 2022 मध्ये देशांत, 7.7 कोटी ई-वे बिल्स  तयार झाले, जुलै, 2022 च्या 7.5 कोटी बिलांच्या तुलनेत, हा आकडा लक्षणीयरित्या अधिक होता.

या महिन्यात, 20 सप्टेंबर या एकाच दिवशी 49,453 कोटी रुपये महसूल संकलन झाले.. आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे 8.77 लाख चालान भरले गेले. याआधी, केवळ जुलै महिन्यात, म्हणजे आर्थिक वर्ष परतावे भरण्याची मुदत संपत असतांना, 20 जुलै ह्या एकाच दिवशी, सप्टेंबरपेक्षा अधिक, म्हणजे, 57,846 कोटी रुपये 9.58 लाख चालान (पावत्या) मधून भरले गेले होते. या  चालानच्या विक्रमी संख्येचा स्पष्ट अर्थ हाच आहे, की, जीएसटीएनचे जीएसटी पोर्टल, आता निर्वेधपणे, स्थिर काम करत आहे.

सप्टेंबर महिन्यात, आणखी एक मैलाचा दगड पार करण्यात आला. या महिन्यात,30 सप्टेंबरपर्यंत  एकूण 1.1 कोटी ई-वे बिल्स आणि ई-इनव्हॉईसेस तयार करण्यात आले. (यात, 72.94 लाख ई-इनव्हॉईसेस आणि 37.74 लाख  ई-वे बिल्स). एनआयसीच्या पोर्टलवर  या कामात कुठलाही अडथळा आला नाही.

खालील तक्ता, चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील बदलते कल दर्शवितो. त्या खालील तक्त्यात, सप्टेंबर 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या जीएसटी महसूलाची राज्यनिहाय आकडेवारी आहे.

 

State-wise growth of GST Revenues during September 2022

State

Sep-21

Sep-22

Growth

Jammu and Kashmir

377

428

13%

Himachal Pradesh

680

712

5%

Punjab

1,402

1,710

22%

Chandigarh

152

206

35%

Uttarakhand

1,131

1,300

15%

Haryana

5,577

7,403

33%

Delhi

3,605

4,741

32%

Rajasthan

2,959

3,307

12%

Uttar Pradesh

5,692

7,004

23%

Bihar

876

1,466

67%

Sikkim

260

285

9%

Arunachal Pradesh

55

64

16%

Nagaland

30

49

61%

Manipur

33

38

17%

Mizoram

20

24

22%

Tripura

50

65

29%

Meghalaya

120

161

35%

Assam

968

1,157

20%

West Bengal

3,778

4,804

27%

Jharkhand

2,198

2,463

12%

Odisha

3,326

3,765

13%

Chattisgarh

2,233

2,269

2%

Madhya Pradesh

2,329

2,711

16%

Gujarat

7,780

9,020

16%

Daman and Diu

0

0

-38%

Dadra and Nagar Haveli

304

312

3%

Maharashtra

16,584

21,403

29%

Karnataka

7,783

9,760

25%

Goa

319

429

35%

Lakshadweep

0

3

731%

Kerala

1,764

2,246

27%

Tamil Nadu

7,842

8,637

10%

Puducherry

160

188

18%

Andaman and Nicobar Islands

20

33

69%

Telangana

3,494

3,915

12%

Andhra Pradesh

2,595

3,132

21%

Ladakh

15

19

27%

Other Territory

132

202

53%

Center Jurisdiction

191

182

-5%

Grand Total

86,832

1,05,615

22%

 

 

***

S.Kakade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864162) Visitor Counter : 281