माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उत्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी भारत सरकारच्या प्रकाशन विभागाला 2022 वर्षासाठी द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे नऊ पुरस्कार
Posted On:
30 SEP 2022 3:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
भारतीय प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (FIP) चा पुस्तक निर्मिती 2022 मधील उत्कृष्टतेसाठीचा बेचाळिसावा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज नवी दिल्लीत झाला. प्रकाशन विभागाच्या संचालनालयाने त्यांच्या पुस्तकांकरिता विविध श्रेणींमध्ये नऊ पुरस्कार पटकावले.
प्रकाशन विभाग संचालनालय DPD ने विविध श्रेणींमध्ये प्रथम सहा पारितोषिके जिंकली ‘बॅलन्सिंग द विस्डम ट्री’ साठी जनरल आणि ट्रेड पुस्तके (इंग्रजी), ‘भारत विभाजन की कहानी’ साठी जनरल आणि ट्रेड पुस्तके (हिंदी), ‘कोर्ट ऑफ इंडिया (मराठी)’ साठी कला आणि कॉफी टेबल बुक्स (प्रादेशिक भाषा), 'इंडिया 2022' साठी संदर्भ पुस्तके (इंग्रजी), ‘कोविड-१९: वैशिक महामारी’ साठी वैज्ञानिक/तांत्रिक/वैद्यकीय पुस्तके (हिंदी), आणि ‘कुरुक्षेत्र’ साठी जर्नल्स आणि हाउस मॅगझिन (हिंदी).
'लोकतंत्र के स्वर' या पुस्तकाला जनरल आणि ट्रेड पुस्तके (हिंदी) श्रेणीमध्ये द्वितीय पारितोषिक, आणि ‘पिनुशी’ साठी मुलांची पुस्तके (सामान्य आवड) (0-10 वर्षे) (हिंदी) या श्रेणीतील दोन तृतीय पारितोषिके तर जर्नल्स आणि हाऊस मॅगझिन (प्रादेशिक भाषा) श्रेणीतील पुरस्कार ‘अजकल (उर्दू)’ विभागाला प्रदान करण्यात आला.
प्रकाशन विभागाने गेल्या वर्षी, विविध श्रेणींमध्ये विविध प्रकाशनांसाठी दहा पुरस्कार जिंकले होते. प्रकाशन विभाग संचालनालय DPD हे पुस्तके आणि जर्नल्सचे भांडार असून याद्वारे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडते. 1941 मध्ये स्थापन झालेला प्रकाशन विभाग हा भारत सरकारचे प्रमुख प्रकाशन गृह आहे, यामध्ये विविध भाषेतील आणि वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पुस्तके आणि जर्नल्स आहेत, ज्यामध्ये इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, वित्त, विज्ञान आणि क्रीडा, गांधीवादी साहित्य, बालसाहित्य तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे आणि नामवंत व्यक्तींची आत्मचरित्रे यांचा समावेश आहे. प्रकाशन विभागाने वाचक आणि प्रकाशकांमध्ये विश्वासार्हता मिळवली असून साहित्याचं सच्चेपणा तसेच प्रकाशनांच्या वाजवी किमतीसाठी ते ओळखले जातात.
* * *
G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863745)
Visitor Counter : 286