पंतप्रधान कार्यालय

डब्ल्यूआयपीओच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारत 40 व्या स्थानावर पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांना वाटला नवोन्मेषींचा अभिमान

Posted On: 29 SEP 2022 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत भारत 40 व्या स्थानावर पोहोचल्याबद्दल भारतीय नवोन्मेषींचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या ट्वीटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

नवोन्मेष हा संपूर्ण देशात परवलीचा शब्द आहे. आपल्या नवोन्मेषींचा अभिमान वाटतो. आपण खूप पुढे आलो आहोत आणि आपल्याला आणखी नवीन उंची गाठायची आहे. 

 

S.Kane /R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1863551) Visitor Counter : 186