पर्यटन मंत्रालय

समग्र दृष्टिकोन आणि लोकसहभाग देशातील पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवू शकतो : जी किशन रेड्डी


हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आयोजित राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचे केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी केले उद्घाटन

Posted On: 19 SEP 2022 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/चंदिगड, 19 सप्‍टेंबर 2022

 

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज भारतातील विविध राज्यांमधील मान्यवरांच्या सत्काराने झाली.  हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री  जयराम ठाकूर आणि केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्य प्रदेश विकास  मंत्री  जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रासह  मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हरियाणा, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब,  आणि हिमाचल प्रदेश या  12 राज्यांचे पर्यटन मंत्री यावेळी उपस्थित होते.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राज्यांच्या  पर्यटन मंत्र्यांची तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली.

कोविड महामारीला मागे सारत  पर्यटन उद्योग आता पुनरुज्जीवनासाठी सज्ज झाला आहे,असे जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. पर्यटनाच्या दृष्टीने भारत एक समृद्ध देश असून भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांना इथल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची आणि अनुभवांची पर्वणीच मिळते. .  समृद्ध वारसा आणि जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारतात  सण, धर्म,परंपरा आणि चालीरीतींचा सर्वांगीण संगम पाहायला मिळतो. भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे तात्काळ उद्दिष्ट तसेच  विकसित राष्ट्र म्हणून दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य  करण्यासाठी  पर्यटन क्षेत्राला अत्यंत  महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे रेड्डी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन पैलूंवर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.  पहिला म्हणजे  सरकारी कामकाजातील समग्र दृष्टिकोन. विविध मंत्रालयांमधील परस्पर कार्यालयीन सीमारेषा पुसून संबंधित सर्व सरकारी मंत्रालये समग्र दृष्टिकोनातून समन्वायाने काम करतो. दुसरे म्हणजे सांघिक भावना. नागरिकांच्या हितासाठी केंद्र  आणि राज्य सरकारने  एकत्र काम करणे, असे रेड्डी यांनी सांगितले. 

"मला मनापासून वाटते की, इथे सर्व सरकारी प्रतिनिधी असल्याने सर्व पैलू  मांडण्यासाठी आणि क्षेत्रासाठी समग्र  दृष्टिकोन मांडण्यासाठी  हे एक योग्य व्यासपीठ आहे", असे ते  म्हणाले. पर्यटनाचा लाभ उतरंडीतल्या  लोकांपर्यंतही  पोहोचावा यासाठी स्थानिक लोकांचा आणि समुदायांचा पाठिंबा मिळायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  समग्र  दृष्टिकोन आणि लोकसहभाग देशातील पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवू शकते, असे  रेड्डी म्हणाले. 

एनएसएस आणि एनसीसीप्रमाणेच युवा पर्यटन क्लब सर्व स्तरावर स्थापन करण्याचे आवाहन रेड्डी यांनी केले. या पर्यटन क्लबच्या स्थापनेसाठी राज्यांनी युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. या माध्यमातून  तरुणांना 'देखो अपना देश' या संकल्पनेची ओळख करून देता येईल. पर्यटनाची खरी क्षमता साध्य करण्यासाठी प्रत्येक स्तरावर समन्वय सुनिश्चित करणे ही सर्वात मूलभूत गरज असल्यावर रेड्डी यांनी भर दिला. 

* * *

R.Aghor/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860585) Visitor Counter : 188