आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 216 कोटी17 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 07 लाखांहून अधिक पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 46,748

गेल्या 24 तासांत देशात 6,298 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.71%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.70% आहे

Posted On: 16 SEP 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांनी  216.17 कोटींचा (2,16,17,78,020) संख्या ओलांडली आहे. 16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 07 लाखांहून अधिक (4,07,62,662) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414755

2nd Dose

10112811

Precaution Dose

6916540

FLWs

1st Dose

18435914

2nd Dose

17709147

Precaution Dose

13458731

Age Group 12-14 years

1st Dose

40762662

2nd Dose

31147130

Age Group 15-18 years

1st Dose

61848557

2nd Dose

52789873

Age Group 18-44 years

1st Dose

561020823

2nd Dose

514784961

Precaution Dose

82630704

Age Group 45-59 years

1st Dose

203983084

2nd Dose

196722401

Precaution Dose

43563390

Over 60 years

1st Dose

127636710

2nd Dose

122983279

Precaution Dose

44856548

Precaution Dose

19,14,25,913

Total

2,16,17,78,020

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 46,748 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.1% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.71% झाला आहे. गेल्या 24 तासांत 5,916 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,39,47,756 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 6,298 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,33,964 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 09 लाखांहून अधिक (89,09,47,646) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1,70% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.89% इतका नोंदला गेला आहे.

 ***

Gopal C/Vikas/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859746) Visitor Counter : 137