शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते रामकृष्ण मिशनच्या ‘जागरण’ कार्यक्रमाचा शुभारंभ
सर्व शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षण व्यवस्थेसाठी एक आरखडा तयार करण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2022 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रामकृष्ण मिशनच्या ‘जागरण’ कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. दिल्लीतील रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी शांतात्मनंद, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई) अध्यक्ष निधी छिब्बर, केंद्रीय विद्यालय संघटना ( केव्हीएस ) , नवोदय विद्यालय समिती. (एनव्हीएस ) आणि मंत्रालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे मोठ्या प्रमाणात स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित आहे, स्वामी विवेकानंदांपासून ते श्री अरबिंदो आणि महात्मा गांधींपर्यंत कित्येक महान व्यक्तींनी देशाला पुढे नेण्यासाठी प्रगतिशील आणि सभ्यतेची मूल्ये रुजलेल्या शिक्षण शैलीची कल्पना मांडली आहे, असे प्रधान यांनी यावेळी सांगितले. सामाजिक परिवर्तन हे शिक्षणाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. भौतिक संपत्तीपेक्षाही ,मूल्ये आणि विद्वत्ता अधिक मौल्यवान आहे, भविष्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य असलेली आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील पिढी घडवण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण अतिशय महत्वाचं आहे, असे त्यांनी सांगितले.
रामकृष्ण मिशनला विद्यार्थ्यांना व्यवहारात उपयोगी होईल असे शिक्षण देण्याचा मोठा वारसा आहे. आजच्या घडीला आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी करत असताना, इयत्ता पहिली ते आठवीसाठी शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्याबरोबरच . इयत्ता 9 वी ते 12 वी साठी अशा प्रकारचे मूल्याधिष्ठित शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यावर देखील भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. हा अनोखा उपक्रम म्हणजे यादृष्टीने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे, ज्याद्वारे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या तत्वज्ञानानुसार विद्यार्थ्यांची जडणघडण होऊ शकेल.
आपली शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय प्राधान्यक्रमाशी संलग्न असायला हवी यावर प्रधान यांनी भर दिला. आपल्याला 21 व्या शतकातील नागरिकांना जागतिक स्तरावर जबाबदारी घेण्यासाठी सक्षम केले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या नेतृत्वाखालील सर्वांगीण शिक्षण प्रणालीवर लक्ष केंद्रित करणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे त्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बालवाटिका ते इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये जीवनातील आव्हानांसाठी सज्ज असलेला आणि राष्ट्रीय प्रगती आणि जागतिक कल्याणासाठी कटिबद्ध असलेला एक प्रतिभासंचय तयार करण्यासाठी सर्व शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एक आरखडा तयार करावा असे आवाहन प्रधान यांनी केले.
R.Aghor /B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1859612)
आगंतुक पटल : 310