पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

उझबेकिस्तानच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 15 SEP 2022 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिरझीयोयेव यांच्या निमंत्रणावरून मी, शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO)  सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंदला भेट देणार आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यास तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या(SCO) विस्ताराबाबत आणि संघटनेतील बहुआयामी आणि परस्पर लाभदायक सहकार्य अधिक सखोल करण्याबाबतच्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे. उझबेकिस्तानच्या अध्यक्षतेखाली व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मी समरकंदमध्ये राष्ट्राध्यक्ष मिर्झीयोयेव यांना भेटण्यासाठी देखील उत्सुक आहे. 2018 मधील त्यांची भारत भेट माझ्या आजही स्मरणात आहे. 2019 मध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला त्यांनी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहून गौरवले होते. याशिवाय, शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर काही नेत्यांसोबत मी द्विपक्षीय बैठका घेईन.

 

  R.Aghor /S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859550) Visitor Counter : 271