आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 215.98 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.07 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 46,389

गेल्या 24 तासात 6,422 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.71%

Posted On: 15 SEP 2022 9:23AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 215.98 (2,15,98,16,124) कोटींची संख्या पार केली.    ्

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.07 (4,07,27,863) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414724

2nd Dose

10112587

Precaution Dose

6906878

FLWs

1st Dose

18435862

2nd Dose

17708630

Precaution Dose

13441086

Age Group 12-14 years

1st Dose

40727863

2nd Dose

31069455

Age Group 15-18 years

1st Dose

61830995

2nd Dose

52749084

Age Group 18-44 years

1st Dose

560997467

2nd Dose

514679713

Precaution Dose

81649999

Age Group 45-59 years

1st Dose

203978989

2nd Dose

196700030

Precaution Dose

43166582

Over 60 years

1st Dose

127633347

2nd Dose

122964430

Precaution Dose

44648403

Precaution Dose

18,98,12,948

Total

2,15,98,16,124

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 46,389 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.1% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%. झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 5,748 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,39,41,840 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 6,422 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 3,14,692 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.06 (89,06,13,782) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.71% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.04% आहे. 

***

Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859442) Visitor Counter : 140