पंतप्रधान कार्यालय
फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
14 SEP 2022 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022
फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या 13 ते15 सप्टेंबर या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. द्विपक्षीय आणि परस्पर हितसंबंधांच्या इतर मुद्यांवर दोघांनी चर्चा केली. तसेच कोलोना यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा मैत्री आणि सहकार्याचा संदेश मोदी यांना दिला. पॅरिस आणि जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या अलीकडच्या भेटींच्या आठवणींना मोदी यांनी उजाळा दिला आणि मॅक्रॉन लवकरात लवकर भारतभेटीवर यावेत, अशी इच्छा व्यक्त केली.
S.Kulkarni /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1859309)
Visitor Counter : 244
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam