पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत जाहीर

Posted On: 13 SEP 2022 9:30AM by PIB Mumbai

तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आणि या अपघातात जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे;

"तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रति शोक संवेदना .जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.  मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल : पंतप्रधान @narendramodi"

***

Jaydevi PS/Sonal C/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858878) Visitor Counter : 142