आयुष मंत्रालय
आयुर्वेद दिन 2022 निमित्त, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने सुरू केला 6 आठवड्यांचा विशेष उपक्रम
Posted On:
12 SEP 2022 7:56PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) ने आज आयुर्वेद दिवस 2022 या विशेष उपक्रमाची सुरूवात केली. आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालय आयोजित करणार असलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी या वर्षी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची (AIIA) नोडल संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे.
12 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या सहा आठवड्याच्या कालावधीत चालणाऱ्या आयुर्वेद दिनाच्या विशेष उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई कालुभाई, सचिव वैद्य राजेश कोटेचा, विशेष सचिव पी.के. पाठक आणि राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोग (NCSIM) चे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी हे दूरदृश्य प्रणालीमार्फत उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सोनवाल म्हणाले, “ हा सहा आठवड्यांचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची कल्पना पुढे नेण्याचा एक उदात्त प्रयत्न आहे. हा उपक्रम तेंव्हाच यशस्वी होईल जेंव्हा आपण भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकू, आणि म्हणूनच आगामी आठवड्यांमध्ये आयुर्वेदाचा संदेश समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना आयुर्वेदाबाबत अधिकाधिक माहिती देण्यावर आम्ही भर देऊ. ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ उपक्रम प्रत्येक घरात ‘संपूर्ण आरोग्यासाठी आयुर्वेद’ याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल. हा उपक्रम आपला देश निरोगी आणि मजबूत बनण्यास सहाय्यक ठरेल.”
आपले विचार मांडताना डॉ. महेंद्रभाई म्हणाले, “इतर देशांशी समन्वय साधून, आयुर्वेदाला प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे आणि “स्वस्थ भारताकडून निरोगी जगाकडे” ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हे आमचे ध्येय आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858789)
Visitor Counter : 217