पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनच्या पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

Posted On: 10 SEP 2022 8:13PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनच्या पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान ट्रस यांचे  पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. ट्रस यांनी यापूर्वी व्यापार सचिव आणि परराष्ट्र सचिव म्हणून भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधात  दिलेल्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.   भारत आणि ब्रिटनमधील व्यापक  धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.

उभय नेत्यांनी  मार्गदर्शक आराखडा 2030 च्या अंमलबजावणीतील प्रगतीमुक्त व्यापार करार संबंधी सध्या सुरु असलेल्या वाटाघाटी, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणि दोन्ही देशांमधील लोकांमधले संबंध यासह द्विपक्षीय हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या दुःखद निधनाबद्दल भारतीयांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे राजघराणे आणि  जनतेप्रति  शोकसंवेदना  व्यक्त केल्या.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1858353) Visitor Counter : 128