गृह मंत्रालय

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्या महाराणी एलिझाबेथ II, यांच्या निधनाबद्दल 11 सप्टेंबर रोजी एक दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Posted On: 09 SEP 2022 3:08PM by PIB Mumbai

 

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय, यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले.या दिवंगत सम्राज्ञीच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या दिवशी संपूर्ण भारतामध्ये ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकवला जातो, त्या सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरच फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाही.

***

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858019) Visitor Counter : 232