संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी टोक्यो येथे झालेल्या द्विपक्षीय बोलण्यांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा स्थितीचा घेतला आढावा
भारत-प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुले आणि नियमाधिष्ठित असावे, याची सुनिश्चिती करण्यातील दोन्ही देशांच्या अत्यंत महत्वाच्या भूमिकेला मान्यता
संरक्षण उपकरणे आणि तांत्रिक सहकार्य यातील उभय देशांच्या भागीदारीची संधी विस्तारण्याची आवश्यकताः राजनाथ सिंग
Posted On:
08 SEP 2022 10:27AM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज जपानचे संरक्षणमंत्री यासुकाझु हामादा यांच्याशी टोक्यो येथे द्विपक्षीय बोलणी केली. दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणि प्रादेशिक मुद्यांच्या विविध पैलुंचा आढावा घेतला. भारत-जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणि भारत-प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुले आणि नियमाधिष्ठित राहील, याची सुनिश्चिती करण्यासाठी दोन्ही देश बजावणार असलेल्या महत्वपूर्ण भूमिकेला मान्यता दिली.
शिष्टमंडळ स्तरीय बोलण्यांच्या दरम्यान, राजनाथ सिंग यांनी भारत जपान यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सरावांतील वाढती सखोलता या दोन्ही देशात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य किती मजबूत होत आहे, याची साक्ष असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला. धर्मा गार्डियन, जिमेक्स आणि मलबार या लष्करी सरांवांसह द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय सहकार्य पुढेही सुरू ठेवण्याविषयीची कटिबद्धता दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केली.
यंदा मार्चमध्ये झालेल्या मिलन या लष्करी सरावादरम्यान पुरवठा आणि सेवा करारांतील पारस्परिक तरतुदीं कार्यान्वित करण्यात आल्याबद्दल त्यांनी स्वागत केले. लढाऊ विमानांचे सराव लवकर घेतल्यास उभय देशांच्या हवाई दलांमध्ये अधिक व्यापक सहकार्य आणिँ माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संगणक प्रणाली अधिक सक्षम होईल, यासही दोन्ही मंत्र्यांनी मान्यता दिली.
संरक्षण उपकरणे आणि तांत्रिक सहकार्य या मुद्यांवर भागीदारीच्या संधीचा विस्तार करण्याची आवश्यकता वाढवण्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जोर दिला. त्यांनी जपानी उद्योगांना भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले. कारण भारत सरकारने संरक्षण उद्योगांच्या वाढीसाठी सुयोग्य वातावरण तयार केले आहे, असे ते म्हणाले.
भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांना या वर्षी 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. मजबूत लोकशाही राष्ट्रे म्हणून दोन्ही देश विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीचा पाठपुरावा करत आहेत.
काल रात्री (7 सप्टेंबर, 2022) टोक्योला पोहचल्यानंतर, राजनाथ सिंग यांनी जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या परिसरात जपानी स्वयंसुरक्षा दलाच्या ज्या जवानांनी कर्तव्य बजावताना आपले प्राणार्पण केले, त्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहून आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरूवात केली. जपानी संरक्षण मंत्र्यांसमवेत द्विपक्षीय बैठक सुरू होण्याअगोदर त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.
नंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासमवेत भारत जपान यांच्यातील दुसऱ्या द्विमंत्रीस्तरीय चर्चेत सहभागी होतील. जपानचे प्रतिनिधित्व संरक्षणमंत्री यासुकाझू हामादा आणि परराष्ट्र मंत्री योशिमासा हायाशी हे करतील. या द्विमंत्रीस्तरीय चर्चेत द्विपक्षीय सहकार्याची क्षेत्रे यांचा आढावा घेऊन पुढील वाटचालीबाबत आराखडा तयार केला जाईल.
***
Gopal C/Umesh K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857730)
Visitor Counter : 228