मंत्रिमंडळ
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मालदीवचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
07 SEP 2022 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
भारताचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मालदीवचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातील 2 ऑगस्ट रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर वस्तुस्थितीरुपी मान्यता दिली आहे.
लाभ:
या सामंजस्य करारान्वये स्थापन करण्यात येणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून भारत आणि मालदीव या दोन्ही देशांना परस्परांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा लाभ घेता येणार असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील सज्जता, प्रतिसाद आणि क्षमता बांधणीच्या बाबतीत अधिक मजबुती मिळविण्यात मदत होणार आहे.
या सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये:
- दोन्ही देशांपैकी कोणत्याही देशाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या आपत्तीच्या घटनेच्या प्रसंगी, त्या देशाच्या विनंतीवरून, आपत्कालीन मदत, प्रतिसाद तसेच मानवतावादी पाठबळ या क्षेत्रांत परस्परांना मदत करता येईल.
- दोन्ही देश आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान करतील, पूर्वानुभव सामायिक करतील आणि आपत्तीला प्रतिसाद, उपशमन, नियोजन आणि सज्जता या संदर्भातील सर्वात उत्तम पद्धतींची माहिती एकमेकांना देतील.
- आपत्तीच्या परिणामकारक उपशमनासाठी या करारात सहभागी असलेले दोन्ही देश आपत्ती प्रतीरोधन आणि धोक्याची पूर्वसूचना यांच्यासह उपग्रहामार्फत मिळालेली दूरस्थ संवेदन माहिती तसेच अवकाश तंत्रज्ञानाधारित साधनांचे विशेष तज्ञांकडे असलेले ज्ञान एकमेकांशी सामायिक करतील.
- दोन्ही देश, आधुनिक माहिती तंत्रज्ञान, पूर्व-इशारा यंत्रणा, दूरस्थ संवेदन प्रणाली, उपग्रहाच्या माध्यमातून मिळणारी माहिती तसेच दिशादर्शक सुविधा यांच्या संदर्भात एकमेकांना सहकार्य करतील.
- आपत्तीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय मुख्य प्रवाहासाठी प्रशिक्षण तसेच क्षमता निर्मिती कार्यक्रमांसंदर्भात विचार करण्यासाठी, दोन्ही देश छोट्या तसेच दीर्घ कालावधीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि बचाव कर्मचारी यांचे प्रशिक्षण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतील.
- दोन्ही देश या विषयावर त्यांच्या देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांची तसेच दोन्ही देशांमध्ये या विषयाबाबत आयोजित सराव कार्यक्रमांची माहिती एकमेकांना देतील आणि संशोधन, माहितीचे आदानप्रदान, विषय तज्ञ पाठबळ कार्यक्रम, आपत्तीचा धोका कमी करण्याच्या बाबतीत उपलब्ध असलेली कागदपत्रे आणि आपत्तीप्रती लवचिकता तसेच हवामान बदलांचा स्वीकार याविषयीचे शैक्षणिक कार्यक्रम यांची देखील माहिती सामायिक करतील.
- आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या इतर उपक्रमांच्या संदर्भात अधिक सहकार्य वाढविण्याबाबत हे दोन्ही देश निर्णय घेतील.
- त्सुनामीची पूर्वसूचना, वादळाची तीव्र गति, मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा, सागरकिनारी क्षेत्रात महासागरजन्य आपत्तींमुळे उद्भवू शकणाऱ्या विविध धोक्यांच्या प्रती असुरक्षित परिस्थिती आणि या धोक्यांच्या तीव्रतेचे मूल्यमापन यांच्याविषयी देखील हे देश माहितीचे आदानप्रदान करतील.
- हे देश सांख्यिकी हवामान अंदाजविषयक माहिती आणि विस्तारित कक्षा हवामान अंदाज यांच्या संदर्भातील माहिती देखील एकमेकांना देऊ शकतील.
- उपग्रहाकडून मिळालेल्या भारताच्या हवामानविषयक माहितीचे काल्पनिक चित्र उभे करून वास्तव वेळची विश्लेषण उत्पादने आणि माहिती प्रसारण यांच्या संदर्भात तसेच भारतीय हवामान खात्याकडून सांख्यिकी हवामान अंदाजविषयक माहिती आणि उपग्रहामार्फत हवामान अंदाज यांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय बाजूकडून केल्या जाणाऱ्या तरतुदींसह सर्व माहिती हे देश एकमेकांना देतील.
- दोन्ही देशांच्या विविध भौगोलिक स्थळांवर हे देश वार्षिक आपत्ती व्यवस्थापन सराव कार्यक्रम सुरु करतील.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857581)
Visitor Counter : 230
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam