आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ मनसुख मांडविया यांनी सिलचरमध्ये सीजीएचएस निरामय आरोग्य केन्द्राचे (वेलनेस सेंटरचे) केले उद्घाटन
Posted On:
07 SEP 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
“देशातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सीजीएचएस सेवा सुलभतेने पोहचिवण्याच्या महत्त्वपूर्ण कामात केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (सीजीएचएस) निरामय आरोग्य केंद्रांच्या संख्येत तिप्पटीने वाढ झाली आहे. सीजीएचएस निरामय आरोग्य केन्द्रांची व्याप्ती 2014 मधील 25 वरून आता 75 शहरांपर्यंत वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जवळच्या जवळ आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याचा दृष्टीकोन स्वीकारला आहे, त्याला सुसंगत कार्य म्हणून या नव्या आरोग्य केंद्रांची स्थापना केली जात आहे.” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज सिलचरमध्ये सीजीएचएस निरामय आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना ही माहिती दिली. डॉ. राजदीप रॉय, खासदार (लोकसभा) आणि आसाममधील सिलचरचे आमदार दीपायन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत दूरदृश्य माध्यमातून हे उद्घाटन संपन्न झाले.
केन्द्र सरकारने देशातील आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असेही डॉ. मांडविया यांनी सांगितले. पीएम-एबीएचआयएम अंतर्गत(पंतप्रधान- आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान) 64,000 कोटी रुपये, 15,000 कोटी ईपीसीपीआर-I अंतर्गत आणि ईपीसीपीआर-II अंतर्गत 23,000 कोटी रुपये राज्यांमध्ये आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अतिरिक्त सचिव आलोक सक्सेना, एमओएचएफडब्लू डॉ. निखिलेश चंद्रा, संचालक सीजीएचएस यांच्यासह केंद्र सरकारचे अधिकारी, सीजीएचएस लाभार्थीही उपस्थित होते.
S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857376)
Visitor Counter : 165