पंचायती राज मंत्रालय
केंद्रीय पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी सरपंच/ग्रामप्रधानांना पत्र लिहून सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी प्रवेशिका 10 सप्टेंबर 2022पासून दाखल करता येतील आणि प्रवेशिका ऑनलाइन दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे
Posted On:
02 SEP 2022 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2022
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री, गिरीराज सिंह यांनी सरपंच/ग्रामप्रधानांना पत्र लिहून सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल. ऑनलाइन प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या पत्रात माहिती दिली की, स्थानिकीकरण आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याशी संबंधित विषयी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींचा सन्मान, सत्कार आणि, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बहुस्तरीय स्पर्धा प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे स्वरूप, कार्यपद्धती आणि श्रेणींमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यांनी पुढे माहिती दिली की, यावर्षी, पंचायतींमध्ये ग्रामीण भागातील शाश्वत विकास उद्दिष्टांचे (SDGs) स्थानिकीकरण आणि ते साध्य करण्याच्या कामाला गती देण्यासाठी, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे स्वरूप आणि श्रेणींमध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत आणि बहुस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी SDGs च्या स्थानिकीकरणाच्या नऊ संकल्पना संरेखित करण्यात आल्या आहेत. या 9 संकल्पना आहेत (i) दारिद्र्यमुक्त आणि वाढीव उपजीविका सुविधा असलेले गाव, (ii) निरोगी गाव, (iii) बालस्नेही गाव, (iv) पुरेसे पाणी असलेले गाव, (v) स्वच्छ आणि हरित गाव, (vi) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव, (vii) सामाजिकदृष्ट्या सुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या न्याय्य गाव (viii) सुशासन असलेले गाव आणि (ix) महिला-स्नेही पंचायत (यापूर्वी गावात स्त्री-पुरुष समानता आधारित विकास म्हणून ओळखले जायचे).
नव्याने पुनर्रचित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रणालीची तपशीलवार माहिती www.panchayataward.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे.
पार्श्वभूमी
देशात पंचायती राज व्यवस्थेला मिळालेल्या घटनात्मक दर्जाचा बहुमान करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयातर्फे दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिन (NPRD) म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी, या प्रसंगी, पंचायती राज मंत्रालयातर्फे, , देशभरातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायती/राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना त्यांनी सेवा आणि सार्वजनिक वस्तूंच्या वितरणात केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार दिले जातात.
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856349)