पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 1 आणि 2 सप्टेंबर रोजी केरळ आणि कर्नाटकला भेट देणार


पंतप्रधान आयएनएस विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे लोकार्पण करतील

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता दर्शवणारा एक चमकणारा दीपस्तंभ , भारतातील प्रमुख औद्योगिक कंपन्या तसेच 100 हून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे पुरविलेली स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री वापरून विक्रांतची निर्मिती झाली आहे

भारताच्या सागरी इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी नौका आहे आणि त्यात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आहेत

वसाहतवादी भूतकाळाच्या सावटातून बाहेर; पंतप्रधानाच्या हस्ते नवीन नौदल चिन्हाचे अनावरण

पंतप्रधान श्री आदि शंकर जन्मभूमी क्षेत्र असलेल्या कलाडी गावाला भेट दे

पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3800 कोटी रुपयांच्या यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील

Posted On: 30 AUG 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि2 सप्टेंबर रोजी कर्नाटक आणि केरळला भेट देणार आहेत. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान कोचीन विमानतळाजवळील कलाडी गावातील  आदि शंकराचार्यांचे पवित्र जन्मस्थान श्री आदिशंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट देतील. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता, पंतप्रधान कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथेआय एन एस  विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

 

कोची येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम

पंतप्रधान आत्मनिर्भतेचे, विशेषत: धोरणात्मक क्षेत्रातील  खंदे समर्थक आहेत. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान आयएनएस विक्रांत या स्वदेशी  बनावटीच्या आणि बांधणीच्या विमानवाहू नौकेचे लोकार्पण करतील. भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाईन ब्युरो (WDB) द्वारे डिझाइन केलेले आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले, विक्रांत हे अत्याधुनिक ऑटोमेशन (स्वयंचलित) वैशिष्ट्यांसह  निर्माण गेले आहे आणि ते भारताच्या सागरी इतिहासात  आतापर्यंत कधीही बांधली  न गेलेली  सर्वात मोठी  नौका आहे.

1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी भारताची पहिली विमानवाहू नौका आणि तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर विक्रांत हे नाव   या स्वदेशी विमानवाहू  नौकेला देण्यात आले आहे. यात  देशातील प्रमुख औद्योगिक , कंपन्या तसेच 100 हून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई)  यांनी तयार केलेली  स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री आहे. विक्रांतच्या नौदलात सामील  होण्यामुळे, भारताकडे आता दोन कार्यरत विमानवाहू नौका असतील, ज्यामुळे देशाची सागरी सुरक्षा बळकट होईल.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान , वसाहतवादी भूतकाळ दूर करत  समृद्ध भारतीय सागरी वारसा  दर्शवणाऱ्या नवीन नौदल चिन्हाचे (निशान) अनावरण देखील करतील

 

मंगळुरू येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम

पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3,800 कोटी रुपयांच्या यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

न्यू मंगळूर बंदर प्राधिकरणाने हाती घेतलेल्या कंटेनर आणि इतर माल हाताळण्यासाठी धक्का क्रमांक 14 च्या यांत्रिकीकरणासाठी 280 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. या यांत्रिकी टर्मिनलमुळे कार्यक्षमता वाढेल विविध टप्प्यांमधील माल हाताळणी चा वेळ सुमारे 35% कमी होईल, त्यामुळे व्यवसायाच्या वातावरणाला चालना मिळेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, ज्यामुळे हाताळणी क्षमतेत 4.2 MTPA पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी 2025 पर्यंत 6 MTPA पेक्षा जास्त होईल.

बंदराद्वारे हाती घेतलेल्या सुमारे 1,000 कोटी रुपये खर्चाच्या  पाच प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. अत्याधुनिक क्रायोजेनिक एलपीजी स्टोरेज टँक टर्मिनलसह सुसज्ज एकात्मिक एलपीजी आणि बल्क लिक्विड पीओएल सुविधा, ज्या 45,000 टन पूर्ण लोड VLGC (खूप मोठे गॅस वाहक) अत्यंत कार्यक्षमतेने उतरवण्यास सक्षम असेल. देशातील सर्वोच्च एलपीजी आयात करणार्‍या बंदरांपैकी एक म्हणून या बंदराचा दर्जा अधिक मजबूत केल्यानंतर ही सुविधा, या भागात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला चालना देईल. साठवण टाक्या आणि खाद्य तेल शुद्धीकरण, बिटुमन स्टोरेज आणि संबंधित सुविधांचे बांधकाम आणि बिटुमन आणि खाद्यतेल साठवण आणि संबंधित सुविधांचे बांधकाम या प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे बिटुमन आणि खाद्यतेल वाहक  जहाजांच्या  येण्याजाण्याच्या वेळेत सुधारणा होईल आणि व्यापारासाठी एकूण मालवाहतुकीचा खर्च कमी होईल. कुलाई येथे फिशिंग हार्बरच्या विकास कामांची पंतप्रधान पायाभरणी करतील, ज्यामुळे मासे पकडण्याची सुरक्षित हाताळणी सुलभ होईल आणि जागतिक बाजारपेठेत चांगली किंमत मिळेल. हे काम सागरमाला कार्यक्रमाच्या अंतर्गत हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे मच्छीमार समुदायाला महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक लाभ मिळतील.

मॅंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड द्वारे हाती घेतलेल्या दोन प्रकल्पांचे बीएस VI अपग्रेडेशन  प्रकल्प आणि सी वॉटर डिसेलिनेशन (विक्षारण) प्रकल्पाचे  उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. BS VI अपग्रेडेशन  प्रकल्पासाठी सुमारे 1830 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामुळे अति-शुद्ध पर्यावरणास अनुकूल BS-VI ग्रेड इंधन (10 PPM पेक्षा कमी सल्फर सामग्रीसह) उत्पादनास सुलभ करेल. सी वॉटर डिसेलिनेशन(विक्षारण), प्रकल्प सुमारे 680 कोटी रुपयांचा असून यामुळे, पिण्यायोग्य पाण्यावरील अवलंबित्व कमी होईल त्याचबरोबर वर्षभर हायड्रोकार्बन्स आणि पेट्रोकेमिकल्सचा नियमित पुरवठा सुनिश्चित होईल.प्रतिदिन 30 दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमता असलेला, हा प्रकल्प रिफायनरी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या समुद्राच्या पाण्याचे पाण्यात रूपांतर करतो.

 

* * *

Jaydevi PS/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855504) Visitor Counter : 183