वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारी ई मार्केटप्लेसच्या प्रगतीचा घेतला आढावा


खर्चात कपात आणि सामाजिक सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन  देण्यासाठी सर्व प्रकारची सरकारी खरेदी ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या गरजेवर  दिला भर

जीईएमवर ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी संपूर्ण प्रक्रिया आणि भरणा ऑनलाइन करण्याची केली सूचना

निहित वेळेत सेवा पुरवण्याबाबतची  देखरेख यंत्रणा सुधारण्याचे जीईएमला दिले निर्देश

पोर्टलवरील फसवणुकीच्या व्यवहारांविरोधात कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याचे केले आवाहन

जीईएम वापरकर्त्याना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा करत आहे

Posted On: 28 AUG 2022 12:49PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारी ई मार्केटप्लेसच्या  (जीईएम) प्रगतीचा आढावा घेतला.

इतर अनेक गोष्टींबरोबरच, जीईएमचे परिचालन तसेच निर्धारित वेळेत खरेदी आणि सेवा वितरण या बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. एप्रिल 22 पासून जीईएमच्या माध्यमातून ऑनलाइन पूर्तता आणि पेमेंट झालेल्या सर्व ऑर्डर्सपैकी 95% हून अधिक ऑर्डर्स वेळेत पूर्ण झाल्या आहेत असे आढळून आले आहे.

गोयल यांनी जीईएमवर ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी संपूर्ण प्रक्रिया आणि भरणा ऑनलाइन करण्याची तसेच निहित वेळेत सेवा पुरवण्याबाबत सूचना केली.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन खर्चात बचत आणि सामाजिक समावेशकता आणण्यासाठी सर्व सरकारी खरेदी पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक अशा जीईएम पोर्टलद्वारे करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

संभाव्य संगनमत आणि फसवणूक  होत असल्यास त्याचा शोध घेण्यासाठी एआय-एमएलचा वापर करण्याबरोबरच खरेदी व्यवहारांतील अनियमितता रोखण्यासाठी कठोर  देखरेख आदी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. अशा प्रकरणात खरेदीदार आणि पुरवठादारांविरोधात  कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याची सूचना गोयल यांनी  केली.

अनियमितता शोधण्याबरोबरच अचूक  निर्णय आणि सार्वजनिक खर्चात बचत सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांपर्यंत  वैशिष्ट्ये अधिक सुलभ पद्धतीने पोहचवण्यासाठी तसेच उत्पादन संबंधी सूचनांसाठी एआय-एमएलचा वापर करण्याची जीईएमची योजना आहे.

पोर्टलवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब तसेच वापरकर्त्यांना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा करण्याचा जीईएमचा प्रयत्न आहे, एमएसएमईचा समावेश आणि हर घर तिरंगा मोहिमेसह जीईएमच्या विविध उपक्रमांची गोयल यांनी प्रशंसा केली.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854992) Visitor Counter : 190