शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या गटाशी साधला संवाद
ऑस्ट्रेलिया -भारत यांच्यामध्ये संशोधन सहकार्य मजबूत करण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन
Posted On:
24 AUG 2022 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आठ ऑस्ट्रेलियन सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या गटाच्या शैक्षणिक धुरिणांसमवेत उभय देशांमध्ये यशस्वी संशोधन सहयोग उभारण्याविषयी संवाद साधला.
देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ या घोषणेला ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली होती, त्याचा पुनरूच्चार शिक्षण मंत्री प्रधान यांनी यावेळी बोलताना केला. यामुळे आगामी दशकामध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ निर्माण होईल असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर होण्यासाठी त्याचबरोबर हे दशक भारताचे टेकएड ठरावे यासाठी आपल्या संसाधनाचा पुरेपूर वापर करण्याचा भारताचा निर्धार त्यांनी सांगितला.भारतासमवेत संशोधन सहकार्य सर्वांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आश्वासक संशोधन भागीदारी आहे. यापुढे संशोधन सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी त्याचबरोबर परस्पर आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रम पूर्ण करण्यासाठी तसेच जागतिक आव्हानांवर योग्य प्रकारे उपाय शोधण्यासाठी नवीन संधींचा स्वीकार केल्याबद्दल त्यांनी आठ विद्यापीठांच्या गटाचे स्वागत केले.
‘‘शिक्षण, संशोधन आणि कौशल्य क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी उदयोन्मुख संधी’’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये मंत्री प्रधान यांनी मोनॅश विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांबरोबर संवाद साधला. यावेळी मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी पुराव्यांवर आधारित संशोधनावर भर दिला आहे. आणि मानवाच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी ‘लॅब- टू -लॅंड‘ आणि ‘लॅंड -टू -लॅब’चा मंत्र दिला आहे. भारतामध्ये सर्व पातळ्यांवर कुतहूल, औत्सुक्यावर आधारित संशोधन आणि नवसंकल्पना रूजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
मेलबर्नमध्ये शिकणा-या भारतीय विद्यार्थ्यांशी प्रधान यांनी संवाद साधला. त्यांचे शैक्षणिक अनुभव जाणून आपल्याला आनंद झाल्याचे प्रधान यांनी सांगितले. भारताला ज्ञान महासत्ता म्हणून स्थापित करण्याच्या त्यांच्या कल्पना ऐकून त्यांनी संतोष व्यक्त केला.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854164)
Visitor Counter : 215