रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
कोणतीही धोकादायक किंवा घातक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनाचा अचूक ठावठिकाणा कळावा याकरता ट्रॅकिंग उपकरणांबद्दल अधिसूचना
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2022 3:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022
राष्ट्रीय परमिटच्या कक्षेत नसलेल्या आर्गॉन, नायट्रोजन, ऑक्सिजन इत्यादी वायूंचे वहन करणारी वाहने आणि धोकादायक किंवा घातक स्वरूपाच्या वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये वाहन स्थान ट्रॅकिंग उपकरणे बसवलेली नाहीत हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
त्यानुसार, मंत्रालयाने, दिनांक 3 ऑगस्ट, 2022 च्या सामान्य वैधानिक नियम ( G.S.R 617(E)) द्वारे, नवीन मॉडेल्सच्या बाबतीत, 1 सप्टेंबर 2022 आणि त्यानंतर उत्पादित केलेल्या N2 आणि N3 श्रेणीतील धोकादायक किंवा घातक वस्तू वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनात आणि , सध्याच्या मॉडेल्सच्या बाबतीत जानेवारी, 2023 पासून धोकादायक किंवा घातक वस्तू वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनात AIS 140 नुसार वाहन ट्रॅकिंग सिस्टीम, डिव्हाइससह फिट करणे अनिवार्य केले आहे.
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1853853)
आगंतुक पटल : 225