पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 20 वर्षांखालील (U20) विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 16 पदके पटकाविणाऱ्या भारतीय कुस्ती संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2022 10:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 20 वर्षांखालील विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 16 पदके (पुरूष आणि महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात प्रत्येकी 7 तर ग्रीको-रोमन प्रकारात 2 पदके) पटकाविणाऱ्या भारतीय कुस्ती संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे,
"आपल्या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आपल्याला अभिमान वाटायला लावणारी कामगिरी केली आहे! 20 वर्षांखालील (U20) विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 16 पदके (पुरूष आणि महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात प्रत्येकी 7 तर ग्रीको-रोमन प्रकारात 2 पदके) मिळविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. ही भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय कुस्तीचे भविष्य सुरक्षित असल्याचे हे यावरून दिसते!".
***
S.Thakur/P.Jambhekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1853765)
आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam