शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी सिडनीतील विविध शाळा, उच्च आणि कौशल्य संस्थांना दिल्या भेटी
प्राथमिक शिक्षण आणि डिजिटल शिक्षणामध्ये ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम पद्धती भारतात राबवता येऊ शकतात - धर्मेंद्र प्रधान
Posted On:
22 AUG 2022 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सिडनी येथील विविध शाळा, उच्च शिक्षण आणि कौशल्य संस्थांना भेटी दिल्या. शिक्षण, संशोधन आणि कौशल्य क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी प्रधान चार दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.
न्यू साउथ वेल्सच्या एम एल सी,शिक्षण आणि बालशिक्षण मंत्री सारा मिशेल, यांच्यासोबत प्रधान यांनी न्यू साउथ वेल्स राज्यातील होमबश वेस्ट पब्लिक स्कूलला भेट दिली आणि प्राथमिक शिक्षणातील उत्कृष्ट पद्धती आणि बालपणीच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती मिळवली. त्यांनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आणि आपले आदरातिथ्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना प्रधान म्हणाले की, मुलांसाठी परवडणारे, सुलभ आणि सार्वत्रिक प्रारंभिक शिक्षण हे चांगले शिक्षण परिणाम आणि सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की न्यू साऊथ वेल्स मधील (NSW) प्रारंभिक शिक्षण आणि डिजिटल शिक्षणातील सर्वोत्तम पद्धती आणि सकारात्मक अनुभव भारतात राबवता येऊ शकतात, जेणेकरून बालपणात काळजी आणि शिक्षण सुलभ होईल, त्याचबरोबर विशेषत: शाळेच्या वेळेनंतर बालकाची काळजी घेण्याबाबतच्या सुविधा अधिक मजबूत करता येतील.
नंतर संध्याकाळी, प्रधान यांनी UNSW, सिडनी येथे युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात "संस्थात्मक सहकार्याद्वारे आपल्या भविष्याचे परिवर्तन" या विषयावर भाषण केले, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन सरकार मधील शिक्षण विभागातल्या वरिष्ठ प्रतिनिधींशी आणि कुलगुरू यांच्याशी संवाद साधला.
* * *
N.Chitale/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853708)
Visitor Counter : 166