श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेतमजूर व ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक - जुलै 2022.

Posted On: 19 AUG 2022 12:23PM by PIB Mumbai

जुलै 2022 या महिन्यासाठीचा शेतमजूर व ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधार : 1986-87= 100)  प्रत्येकी 6 अंकांनी वाढून 1131 ( एक हजार एकशे एकतीस ) व 1143 ( एक हजार एकशे त्रेचाळीस ) झाला आहे. शेतमजूर व ग्रामीण मजुरांसाठीच्या या सर्वसाधारण निर्देशांकात झालेली वाढ मुख्यत्वेकरून अन्नधान्याच्या गटामुळे झाल्याचे दिसून येते . तांदूळ, गव्हाचे पीठ, बाजरी, डाळी, दूध, ताजे मासे, कांदा, सुकी व हिरवी मिरची , मसाले, भाज्या आणि फळे, तयार चहा, इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे निर्देशांकात  प्रत्येकी 4.41 आणि 4.07 इतकी वाढ झाली आहे. 


सर्व राज्यांमधून या शेतमजूर व ग्रामीण मजुरांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात सर्वाधिक वाढ (प्रत्येकी 13 अंक) आसाम मध्ये नोंदवण्यात आली आहे. यासाठी मुख्यत्वेकरून तांदूळ, हिरवी मिरची, भाज्या व फळे, इ  यांच्या किमतीतील वाढ कारणीभूत आहे. 

Group

Agricultural Labourers

Rural  Labourers

 

June, 2022

July, 2022

June, 2022

July, 2022

General Index

1125

1131

1137

1143

Food

1052

1058

1060

1066

Pan, Supari,  etc.

1911

1913

1920

1923

Fuel & Light

1261

1263

1254

1255

Clothing, Bedding  &Footwear

1183

1190

1218

1226

Miscellaneous

1191

1196

1196

1201

 

खाद्यान्न  महागाई निर्देशांक जुलै 2022 मध्ये प्रत्येकी  5.38% आणि  5.44% इतका नोंदवण्यात आला . जून 2022 मध्ये हाच निर्देशांक प्रत्येकी 5.09% आणि 5.16% इतका होता, तर मागील वर्षीच्या जुलै महिन्यात तो प्रत्येकी 2.66% आणि 2.74% इतका नोंदवला गेला होता. 

**

S.Kane/Uma.R/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1853109) अभ्यागत कक्ष : 225