गृह मंत्रालय
बेकायदेशीररित्या राहणारे रोहिंग्या
Posted On:
17 AUG 2022 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2022
बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी रोहिंग्याबाबत काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या संदर्भात स्पष्ट करण्यात येत आहे की गृह मंत्रालयाने नवी दिल्लीतील बकरवाला येथे बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्या स्थलांतरितांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या (EWS) सदनिका देण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. दिल्ली सरकारने रोहिंग्यांना अन्य ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव दिला आहे. दिल्लीत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांना त्यांच्या देशात परत पाठ्वण्याबाबतचा मुद्दा गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून संबंधित देशाला कळवला आहे , त्यामुळे रोहिंग्यांना ते सध्या राहत असलेल्या कांचन कुंज, मदनपूर खादर इथे राहू द्यावे असे निर्देश गृह मंत्रालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत.
बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी लोकांना कायद्यानुसार हद्दपार होईपर्यंत डिटेंशन सेंटरमध्ये स्थानबद्ध केले जाते. दिल्ली सरकारने त्यांचे सध्याचे ठिकाण डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी तत्काळ ते घोषित करावे असे निर्देश देण्यात आले आहे.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852685)
Visitor Counter : 227