ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे प्रेशर कुकर विकल्याबद्दल सीसीपीएने फ्लिपकार्टला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला


गुणवत्ता नियंत्रण नियमांची पूर्तता न केलेले 598 प्रेशर कुकर परत घेण्याचे आणि ग्राहकांना त्याच्या मूल्याची परतफेड करण्याचे फ्लिपकार्टला आदेश

Posted On: 17 AUG 2022 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2022

 

उत्पादनाच्या दर्जाबाबत अनिवार्य असलेल्या नियमांची पूर्तता न करणारे घरगुती वापराचे  प्रेशर कुकर विकण्याची परवानगी देऊन ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स मंचाविरोधात आदेश जारी केला आहे.   

मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या नेतृत्वाखाली, सीसीपीएने फ्लिपकार्टला त्यांच्या  मंचावरून विकलेले 598 प्रेशर कुकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सूचित करण्याचे ते प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांना त्याच्या मूल्याची परतफेड करण्याचे आणि याबाबतचा अनुपालन अहवाल 45 दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या ई-कॉमर्स मंचावरून अशा प्रकारचे प्रेशर कुकर विकण्याची परवानगी देऊन ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला 1,00,000 रुपये  दंड भरण्याचा आदेशदेखील देण्यात आला आहे.        

घरगुती वापराचे प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश 01.02.2021 रोजी जारी करण्यात आला असून त्यानुसार घरगुती वापराच्या सर्व प्रेशर कुकरसाठी IS 2347:2017 चे पालन अनिवार्य आहे. म्हणून, 01.02.2021 पासून घरगुती वापराच्या सर्व प्रेशर कुकरसाठी IS 2347:2017 चे पालन करणे बंधनकारक आहे, तसेच ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून विकल्या जाणाऱ्या प्रेशर कुकर बाबत या नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

उत्पादनाच्या विक्रीच्या प्रत्येक पावतीवर 'पॉवर्ड बाय फ्लिपकार्ट' या शब्दांचा अनिवार्य वापर करणे आणि विविध फायद्यांचा लाभ देण्यासाठी सोने, चांदी आणि कांस्य असे विक्रेत्यांचे वर्गीकरण करणे यासारख्या 'फ्लिपकार्ट वापराच्या अटी' अंतर्गत असलेल्या तरतुदी यामधून आपल्या मंचावरून  प्रेशर कुकरची विक्री करण्यामागील फ्लिपकार्टची भूमिका दिसून येत असल्याचे निरीक्षण सीसीपीएने केले.  

आपल्या ई-कॉमर्स व्यासपीठावरून अशा प्रकारच्या प्रेशर कुकरच्या विक्री द्वारे फ्लिपकार्टने एकूण 1,84,263 रुपये  उत्पन्न मिळवले आहे.   

फ्लिपकार्टने जेव्हा अशा प्रेशर कुकरच्या विक्रीतून व्यावसायिक नफा मिळवला, तेव्हा या विक्रीपासून  फायदा मिळवला आहे, तेव्हा या उत्पादनाची ग्राहकांना विक्री केल्यामुळे उद्भवणारी भूमिका आणि जबाबदारीपासून ते स्वतःला वेगळे ठेवू शकत नाही असे सीसीपीएने म्हटले आहे.  

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852682) Visitor Counter : 243