सांस्कृतिक मंत्रालय

'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा’ या संकेतस्थळावर सहा कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले


चंदीगढमध्ये 5,885 लोकांनी राष्ट्रध्वजाची सर्वात मोठी मानवी प्रतिमा तयार करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला विक्रम

Posted On: 16 AUG 2022 6:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2022

 

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी, लोकांनी  तिरंगा ध्वज घरी फडकावण्यासाठीची हर घर तिरंगा मोहीम पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.

जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना बळकट करणे आणि लोकसहभागातून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करणे, ही या उपक्रमामागील संकल्पना होती. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांनी या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला विविध ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था आणि स्वयं-सहायता गटांनीही आपले योगदान देऊन ही मोहीम एक यशस्वी केली.

या मोहिमेदरम्यान 5,885 लोकांच्या सहभागातून चंदीगडच्या भव्य क्रिकेट स्टेडियमवर राष्ट्रध्वजाची सर्वात मोठी मानवी प्रतिमा साकार करतगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‘ मध्ये नाव नोंदवले गेले. यासारखे अनेक उपक्रम या मोहिमेतील मैलाचे दगड ठरले. 

आणखी एक अतुलनीय कामगिरी म्हणजे ‘हर घर तिरंगा’ या वेबसाईटवर आजपर्यंत सहा कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड केले गेले. हायब्रीड स्वरूपात तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वैयक्तिक संदर्भात तिरंग्यासोबत  शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या तिरंगा ध्वजाशी  एकरूप होण्याची कल्पना करण्यात आली आणि या उपक्रमासाठी तयार केलेल्या विशेष वेबसाइटवर सेल्फी अपलोड करण्याच्या कृतीद्वारे सामूहिक उत्सव आणि देशभक्तीचा उत्साह वाढवण्याचे प्रयत्न केले. (www.harghartiranga.com).

तसेच,  'आझादी का अमृत महोत्सवा'चा एक भाग म्हणून आणि  'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत बक्षी स्टेडियम येथील जिल्हा प्रशासन श्रीनगरने येथे 1850 मीटर लांब राष्ट्रीय ध्वज फडकावला केला आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली.

हर घर तिरंगा  मोहीम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला. समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांचा असा उत्साह राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेच्या अतूट भावनेचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशाने हर घर तिरंगा मध्ये सहभाग घेतला आणि तिरंग्यासोबत आतापर्यंत 6 कोटींहून अधिक सेल्फी घेतले आणि अपलोड केले. हे या महान राष्ट्राबद्दलचे आपले प्रेम आणि अभिमान दर्शवते. तिरंगासोबत सेल्फी घेतलेल्या सर्वांना मी विनंती करेन की, या राष्ट्रीय सणाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी हर घर तिरंगा पोर्टलवर फोटो अपलोड करत रहा. अशी भावना व्यक्त करत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री  जी किशन रेड्डी यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.

 

R.Aghor/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852326) Visitor Counter : 144