गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'सदैव अटल' स्मारकाला भेट देऊन वाहिली आदरांजली


पूज्य अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भारत मातेचं वैभव पुनर्संचयित करण्यात घालवला

भारतीय राजकारणात गरीबांच्या कल्याणाचे आणि सुशासनाचे नवे पर्व सुरू केलं. त्याच प्रमाणे वाजपेयी यांनी जगाला भारताचे धैर्य आणि सामर्थ्याची जाणीव करून दिली

Posted On: 16 AUG 2022 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज नवी दिल्ली इथल्या 'सदैव अटल' स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.
अमित शाह यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं की,पूज्य अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भारत मातेचं वैभव पुनर्संचयित करण्यात घालवला. त्यांनी भारतीय राजकारणात गरीबांच्या कल्याणाचे आणि सुशासनाचे नवे पर्व सुरू केलं. त्याच प्रमाणे वाजपेयी यांनी जगाला भारताचे धैर्य आणि सामर्थ्याची जाणीव करून दिली. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

 

S.Bedekar/S.Mohite/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852244) Visitor Counter : 186