मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

भारत सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम साजरा


केंद्रीय मंत्री संजीव कुमार बलियान यांनी उत्तर प्रदेशात आग्रा येथे झलकारी बाई यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकविला

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून देशातील महत्त्वाच्या 400 स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 16 AUG 2022 11:41AM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगाकार्यक्रम  साजरा केला. स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांच्या  नेतृत्वाखाली  देशातील महत्त्वाच्या 400 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या सहकार्यासह काल 15 ऑगस्ट 2022 रोजी आग्रा येथील झलकारी बाई यांच्या पुतळ्याजवळ हर घर तिरंगाकार्यक्रम साजरा केला.

या कार्यक्रमाला इतर मान्यवरांसह, केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बलियान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी, केंद्रीय मंत्री डॉ. बलियान यांच्या हस्ते आग्रा येथील झलकारी बाई यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिक तसेच हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा सत्कार देखील केला. केंद्रीय मंत्री डॉ.बलियान यांनी यावेळी उपस्थित जनतेला हर घर तिरंगाअभियानात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001VMFV.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0028RRJ.jpg

या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकारने सर्व प्रशासनिक आणि वाहतूकविषयक मदत पुरविली.

***

S.Bedekar/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852216) Visitor Counter : 128