गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.


भारतीय संस्कृती, चैतन्यशील लोकशाही परंपरा आणि गेल्या 75 वर्षांतील कामगिरीचा अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे.

ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना मी अभिवादन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च महत्त्व देऊन आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचे सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करत आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी सर्वांना आवाहन करतो की, आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी कठोर परिश्रमाद्वारे विकासाच्या या अखंड प्रवासात योगदान द्या.

Posted On: 15 AUG 2022 11:36AM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना  शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये अमित शाह म्हणाले की, भारताची संस्कृती, चैतन्यशील लोकशाही परंपरा आणि गेल्या 75 वर्षांतील कामगिरीचा अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे. ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आमच्या शूर सैनिकांना मी अभिवादन करतो.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च महत्त्व देऊन आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचे सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करत आहेत. आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी प्रत्येकाने कठोर परिश्रमाद्वारे  विकासाच्या या अखंड प्रवासात योगदान द्या.

***

SushmaK/VY/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851998) Visitor Counter : 249