गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानावर तिरंगा फडकवला
मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या साहसी वीरांना अमित शाह यांनी अभिवादन केले
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर देशाचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या अभियानात सहभागी होण्याचे केले देशवासियांना आवाहन
तिरंगा ध्वजासोबत आपले छायाचित्र देखील http://harghartiranga.com वर अपलोड करण्याचे आणि इतरांना देखील आपले छायाचित्र अपलोड करण्यासाठी प्रेरणा देण्याचे देखील केले आवाहन
Posted On:
13 AUG 2022 11:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानावर तिरंगा फडकवला. मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या साहसी वीरांना देखील त्यांनी यावेळी अभिवादन केले. आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह म्हणाले, “तिरंगा हा आपला अभिमान आहे. प्रत्येक भारतीयाला तो एकत्र आणतो आणि प्रेरणा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या आवाहनानुसार आज मी नवी दिल्ली येथील माझ्या घरावर तिरंगा फडकवला आणि मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या साहसी वीरांना वंदन केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर देशाचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे आणि प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या अभियानात सहभागी होण्याचे मी सर्व देशवासीयांना आवाहन करत आहे. तिरंगा ध्वजासोबत तुमचे छायाचित्र देखील http://harghartiranga.com वर अपलोड करा आणि अशाच प्रकारे इतरांनाही त्यांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी प्रेरित करा.”
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851490)
Visitor Counter : 200