वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियानांतर्गत (NIPAM )दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशात मधल्या 3662 शैक्षणिक संस्थांचा समावेश
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2022 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियानांतर्गत 10 लाख मुलांना बौद्धिक संपदा जागरूकता आणि मूलभूत प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य 15 ऑगस्ट 2022 या मुदतीपूर्वीच 31 जुलै 2022 रोजी साध्य करण्यात आले.
बौद्धिक संपदा जागरूकता आणि मूलभूत प्रशिक्षणासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून 8 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान सुरू करण्यात आले. हा उपक्रम वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पेटंट्स,डिझाइन्स,आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रकांच्या बौद्धिक संपदा कार्यालयातर्फे राबवला जातो.
08 डिसेंबर 2021 ते 31 जुलै 2022 या दरम्यान अनेक मैलाचे दगड उपक्रमात साध्य करण्यात आले त्याचा तपशील पुढील प्रमाणे...
1. हा कार्यक्रमात सहभागी झालेले एकूण प्रशिक्षणार्थी विद्यार्थी -10, 05, 272
2. एकूण सहभागी शैक्षणिक संस्था-3662
3. भौगोलिक विस्तार-28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
S.Kulkarni/S.Mohite/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1851014)
आगंतुक पटल : 437