पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्यांचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Posted On:
09 AUG 2022 9:35AM by PIB Mumbai
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याला बळकट करणाऱ्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मालिकेद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत;
" बापूंच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात ज्यांनी भाग घेतला आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळकट केले त्या सर्वांचे मी स्मरण करत आहे."
"मुंबईतील भारत छोडो आंदोलनाच्या प्रारंभी महात्मा गांधींचे हे चित्र आहे. (नेहरू मेमोरियल संग्रहातून घेतलेले)"
"9 ऑगस्ट 1942 हा दिवस ज्या दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली तो दिवस आपल्या राष्ट्रीय क्रांतीचे धगधगते प्रतीक बनले आहे" असे लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी म्हटले आहे.
बापूंच्या प्रेरणेने भारत छोडो आंदोलनात जेपी आणि डॉ. लोहिया यांसारख्या महान व्यक्तींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा उल्लेखनीय सहभाग होता."
***
S.Patil/P. Jambhekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850168)
Visitor Counter : 336
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam