पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताचा मुष्टीयोद्धा मोहम्मद हुसेमुद्दिन याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2022 8:28AM by PIB Mumbai

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय मुष्टियोद्धा मोहम्मद  हुसेमुद्दिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

"मोहम्मद हुसेमुद्दिन हा अतिशय उत्तम मुष्टियोद्धा आहे, ज्याने अनेक क्रीडा  स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. विस्मयकारी तंत्र आणि जिगरबाज वृत्ती यामुळे या गुणी खेळाडूने बर्मिंगहॅम येथे पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात  कांस्य पदक पटकावले आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याला माझ्याकडून उत्तमोत्तम शुभेच्छा. #Cheer4India"

***

SonalT/ShaileshP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1849324) आगंतुक पटल : 211
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam