पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या कुस्तीमध्ये 76 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पूजा सिहागचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2022 8:21AM by PIB Mumbai

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या कुस्तीमध्ये 76 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल कुस्तीपटू पूजा सिहाग हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

"पूजा सिहाग हिने एक प्रतिभावान कुस्तीपटू असा स्वतःचा ठसा उमटवला आहे. कधीही हार न मानण्याच्या तिच्या वृत्तीमुळे तिने अनेक आव्हानांवर मात केली आहे. सीडब्लूजी 2022 मध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन. भविष्यातही ती भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे. #Cheer4India"

***

SonalT/ShaileshP/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1849312) आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam