दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

हर घर तिरंगा मोहीम: देशातील सर्व टपाल कार्यालये स्वातंत्र्य दिनापर्यंत सुटीच्या दिवसासहित सर्व दिवस सुरू राहणार


हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री आणि वितरण होईल अधिक सोपे

Posted On: 06 AUG 2022 8:38PM by PIB Mumbai

 

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री आणि वितरण सुलभ रीतीने करण्यासाठी, सर्व पोस्ट ऑफिस 2022 च्या स्वातंत्र्य दिनापूर्वी सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यरत असतील.

या सार्वजनिक मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील सर्व डिलिव्हरी टपाल कार्यालये आणि इतर महत्त्वाची टपाल कार्यालये कार्यरत असणार आहेत.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे 7, 9 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी टपाल कार्यालयातील किमान एका खिडकीद्वारे राष्ट्रध्वज विक्रीसाठी विशेष व्यवस्था केली जाईल.  सर्व डिलिव्हरी टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज वितरणासाठी विशेष व्यवस्था देखील केली जाईल.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1849187) Visitor Counter : 206