पंतप्रधान कार्यालय
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल 2022 स्पर्धेत भारताचा कुस्तीपटु दीपक पुनियाने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2022 12:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा कुस्तीपटु दीपक पुनिया याने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल (2022) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्द्ल शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की
आपल्या दीपक पुनियाच्या क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीचा मला अत्यंत अभिमान आहे. तो भारताचा अभिमान आहे आणि त्याने भारताला अनेक गौरवाचे क्षणं दिले आहेत. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अत्यंत आनंद झाला आहे. त्याच्या सर्व आगामी प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा आहेत.
***
MC/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849035)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam