पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर याचे उंच उडीमध्ये भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2022 9:55AM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत(2022) तेजस्विन शंकरने उंच उडी या क्रीडाप्रकारात भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. तेजस्विन शंकर याला उंच उडी या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक मिळाले असून ट्रॅक अँड फिल्ड या क्रीडाप्रकारातील ते भारताचे पहिलेच पदक आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, तेजस्विन शंकरने इतिहास रचला आहे. त्याने राष्ट्रकूल स्पर्धेत उंच उडीमध्ये पहिले पदक जिंकले आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या प्रयत्नांचा मला अभिमान आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो. तो असेच यश उत्तरोत्तर मिळवत राहो.
***
Jaydevi PS/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1848205)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam