युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल स्पर्धा (सीडब्ल्यूजी) 2022 मध्ये 4 थ्या दिवशी भारतीय क्रीडापटूंनी पटकावले एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं

Posted On: 02 AUG 2022 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

ठळक मुद्दे:

  • शुशीला देवी लिकमाबम, विजय कुमार यादव आणि हरजिंदर कौर यांचा चौथ्या दिवशी पदक विजेते म्हणून उदय.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिनंदन केले. 
  • एनएसएनआयएस पतियाळाने या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये (सीडब्ल्यूजी) देखील चॅम्पियन्सचे (सर्वोत्तम खेळाडूंचे) माहेरघर असल्याचे सिद्ध केले: अनुराग ठाकूर 

 

बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या 4 थ्या दिवशी भारताने तीन पदके जिंकली. ज्युदोपटू शुशीला देवी लिकमाबमने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले, ज्युदो स्टार विजय कुमार यादवने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि भारोत्तोलक हरजिंदर कौरने महिलांच्या 71 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारताने जिंकलेल्या पदकांची एकूण संख्या 9 वर पोहोचली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी खेळाडूंचे त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

ट्वीट संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “तुझ्या प्रभावी कामगिरीने तुझ्या असंख्य प्रशंसकांना जिंकले आहे आणि लाखो मुलींना प्रेरित केले आहे. भारताला तुमचा अभिमान आहे.”

राष्ट्रपतींनी असेही ट्विट केले आहे की, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात कांस्यपदक जिंकल्याबद्दल हरजिंदर कौरचे अभिनंदन. या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे पार केले आहेत.  ही सर्वांसाठी खूप प्रेरणादायी कथा आहे. पुढील वर्षांमध्ये तुला अधिक यश प्राप्त होवो.” 

आणखी एका ट्वीटमध्ये राष्ट्रपती म्हणाल्या,“विजयकुमार यादवने त्याच्या पहिल्याच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रेरणादायी कामगिरी केली. ज्युदोमध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. या आधीच्या फेऱ्यांमधील तुझ्या वर्चस्वाने तुझ्या क्षमतेचे प्रदर्शन केले ज्याने तुला पदक मिळवून दिले. भविष्यात तुला आणखी यश मिळो अशी मी शुभेच्छा देते.”

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुशीला देवी लिकमाबम, विजय कुमार यादव आणि हरजिंदर कौर यांचे अभिनंदन केले आहे. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले; "शुशीला देवी लिकमाबमच्या असामान्य कामगिरीने मी आनंदित झालो आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन.

तिने उल्लेखनीय कौशल्य आणि विजिगीषा प्रदर्शित केली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.”

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे, “विजय कुमार यादव याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले असून देशाचा अभिमान वाढवला आहे. त्याचे हे यश भारताच्या क्रीडा क्षेत्रातील भविष्यासाठी शुभसंकेत आहे. आगामी काळातही तो यशाची नवीन शिखरे सर करत राहो.” 

दुसर्‍या एका ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणाले.” आपल्या भारोत्तोलाकांनी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हे पुढे चालू ठेवत हरजिंदर कौरने कांस्यपदक जिंकले. या विशेष कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला अनेक शुभेच्छा.”

 

 

क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी देखील पदक जिंकल्याबद्दल शुशीला देवी लिकमाबम, विजय कुमार यादव आणि हरजिंदर कौर यांचे अभिनंदन केले आहे.

अनुराग ठाकूर यांनी ट्वीट केले आहे, “हरजिंदर कौर तुझे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन! पंजाबमधील एका गावातून कांस्य पदकासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा तुझा प्रवास अनेक तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा देईल!”

दुसऱ्या एका ट्वीट मध्ये ठाकूर म्हणाले, “आनंददायी बाब आहे की एनएसएनआयएस पतियाळा ज्या ठिकाणी तू प्रशिक्षण घेतले, त्याने या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये देखील चॅम्पियन्सचे (सर्वोत्तम खेळाडूंचे) माहेरघर असल्याचे सिद्ध केले. तुझे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील रजत पदक कदाचित तुझे मोठ्या विजयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल होते. भविष्यातील आणखी मोठ्या यशासाठी मी तुला शुभेच्छा देतो!”  

ठाकूर पुढे म्हणाले, “मला या गोष्टीचा आनंद होत आहे की आपण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये ज्युदोमध्ये चांगली कामगिरी केली.  शुशीला देवीने रौप्यपदक जिंकले, तर विजय कुमार यादवने सायप्रसच्या पेट्रोस सीवर 10-0 असा विजय मिळवत कांस्य पदक जिंकून, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील त्याचे पहिले पदक जिंकून पदक तालिकेत भर घातली. मी त्या दोघांचे अभिनंदन करतो!!”

 

 

Click here for achievements of Shushila Devi Likmabam,

Click here for achievements of Vijay Kumar Yadav

Click here for achievements of Harjinder Kaur

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847365) अभ्यागत कक्ष : 253