पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

प्रविष्टि तिथि: 23 JUL 2022 9:41AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी मन की बात चा काही वर्षांपूर्वीचा तो उतारा देखील शेअर (सामायिक) केला, ज्यामध्ये ते लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल बोलले होते. त्यांनी आपल्या मुंबई भेटी दरम्यानची छाया चित्र देखील शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी लोकमान्य टिळक यांचा जवळचा संबंध असलेल्या लोकमान्य सेवा संघाला भेट दिली होती.  

आपल्या ट्वीटर संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“मा भारतीचे महान सुपुत्र, लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त मी नमन करतो. हे दोन दिग्गज धैर्य आणी देशभक्तीचे प्रतिक आहेत. काही वर्षांपूर्वी #MannKiBaat  दरम्यान मी त्यांच्याबद्दल जे बोललो होतो ते शेअर करत आहे.”

“लोकमान्य टिळकांच्या चिरंतन वारशांपैकी एक म्हणजे मोठ्या प्रमाणातील गणेशोत्सव, ज्यांनी लोकांमध्ये सांस्कृतिक चेतना जागवली. माझ्या एका मुंबई भेटी दरम्यान मी लोकमान्य सेवा संघाला भेट दिली होती, ज्याचा लोकमान्य टिळक यांच्याशी जवळचा संबंध आहे.”  


*****

Ankush.C/R. Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1844163) आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam