आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 201.30 कोटी मात्रांचा टप्पा पार केला


12 ते 14 वयोगटात 3.83 कोटीहून अधिक किशोरांना लसीची पहिली मात्रा

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,49,482

गेल्या 24 तासांत, 21,880 नव्या रूग्णांची नोंद

सध्याच्या घडीला कोविडमुक्तीचा दर 98.46 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.51% टक्के

Posted On: 22 JUL 2022 11:44AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 201.30 (2,01,30,97,819)  कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,65,61,942  सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत  3.83 कोटींपेक्षा  (3,83,43,085) अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10410750

2nd Dose

10083124

Precaution Dose

6115148

FLWs

1st Dose

18428561

2nd Dose

17658239

Precaution Dose

11693029

Age Group 12-14 years

1st Dose

38343085

2nd Dose

26817744

Age Group 15-18 years

1st Dose

60961790

2nd Dose

50476535

Age Group 18-44 years

1st Dose

559109317

2nd Dose

506930982

Precaution Dose

10976867

Age Group 45-59 years

1st Dose

203605661

2nd Dose

194808808

Precaution Dose

7974448

Over 60 years

1st Dose

127386371

2nd Dose

121730361

Precaution Dose

29586999

Precaution Dose

6,63,46,491

Total

2,01,30,97,819

 

भारतातील एकूण उपचाराधीन रूग्णसंख्या सध्याच्या घडीला 1,49,482 आहे. उपचाराधीन रूग्णसंख्येची टक्केवारी देशाच्या एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत 0.34 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.46% झाला आहे.

गेल्या 24 तासात 21,219 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,31,71,653. झाली आहे.

गेल्या 24 तासात 21,880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24  तासांत, एकूण 4,95,359 एकूण चाचण्या पार पाडल्या आहेत. आतापर्यंत, भारताने एकूण 87.16 (87,16,56,205)कोटी हून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला  4.51 टक्के इतका असून दैनंदिन सध्याच्या घडीला 4.42 टक्के इतका आहे.

 

 

 

 

S.Thakur/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843708) Visitor Counter : 189