रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करणार
Posted On:
15 JUL 2022 3:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 17 जुलै 2022 रोजी देशव्यापी वृक्षारोपण मोहीम आयोजित करणार आहे. एकाच दिवशी देशभरात सुमारे एक लाख झाडे लावण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या प्रादेशिक कार्यालयांनी वृक्षारोपणासाठी 100 ठिकाणे निवडली आहेत जी राष्ट्रीय महामार्गांलगत एनएचएआयची जमीन आणि टोल प्लाझा येथे आहेत. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 लाख झाडे लावण्याचे महामार्ग प्राधिकरणचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मंत्रालय आणि एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणार आहेत. पर्यावरण शाश्वततेचा संदेश देणार्या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोक, स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील महिला बचत गटांना देखील वृक्षारोपण आणि झाडांच्या देखभालीसाठी सहभागी करून घेतले जाणार आहे.
पर्यावरण-स्नेही राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वेळोवेळी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करते. राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि वन व फलोत्पादन तज्ञांच्या माध्यमातून राज्य सरकारी संस्था, खाजगी वृक्षारोपण संस्था महिला बचतगट यांना सहभागी करून घेऊन राष्ट्रीय महामार्गालगत सामूहिकपणे वृक्षारोपण करणे ही कल्पना आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841758)
Visitor Counter : 314