युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी क्रीडापटुंना रोख पुरस्कार, राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्तीवेतनासाठी सुधारित योजना सुरू केली


पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडापटू कल्याण आणि निवृत्तीवेतन योजना आता ऑनलाईन

क्रीडापटुंना विक्रमी वेळेत लाभ देण्यासाठी सुधारित योजना अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रदान करणारः अनुराग ठाकूर

व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्या खेळाडू, क्रीडा केंद्रे आणि क्रीडा स्पर्धांसाठी एनएसडीएफच्या संकेतस्थळामार्फत थेट योगदान देऊ शकतील

क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना रोख पुरस्कारांच्या लाभांसाठी अर्ज करण्याच्या दृष्टीने dbtyas-sports.gov.in संकेतस्थळ सुरू केले

क्रीडा मंत्रालयाकडून एनएसडीएफसाठी nsdf.yas.gov.in यापरस्परसंवादात्मक संकेतस्थळाचाही आरंभ

Posted On: 08 JUL 2022 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022

 

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत खेळाडूंसाठी रोख पुरस्कार तसेच खेळाडूंसाठी राष्ट्रीय कल्याण आणि पेन्शन (एनएसडीएफ) सुधारित योजना सुरू केली तसेच क्रीडा विभागाच्या योजनांसाठी dbtyas-sports.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधीचे संकेतस्थळ nsdf.yas.gov.in  याची सुरुवात केली.

अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्यांना तसेच त्यांच्या प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्याच्या य़ोजना, क्रीडा विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण आणि गुणवत्ता धारक खेळाडुंना निवृत्तीवेतन (पीडीयूएनडब्ल्यूएफएस) देण्याच्या योजनेत  अनेक महत्वाचे बदल केले असून या योजना अधिक खेळाडूस्नेही, सहज उपलब्ध होण्यासारख्या आणि पारदर्शक बनवण्याचा दृष्टीकोन यामागे आहे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, हे पाऊल म्हणजे किमान सरकार, कमाल प्रशासन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन पुढे घेऊन जाण्याच्या आणि सरकार आणि नागरिक, व्यवस्था आणि सुविधा तसेच प्रश्न आणि उपाय यांच्यातील तफावत भरून काढून नागरिकांना सक्षम करताना डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की या सुधारित योजना क्रीडापटुंना विक्रमी वेळेत लाभ देण्यात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रदान करतील.

कोणताही वैयक्तिक खेळाडू त्याच्या किवा तिच्या क्षमतेनुसार, तिन्ही योजनांच्या लाभांसाठी थेट अर्ज करू शकेल, यावर ठाकूर यांनी प्रकाश टाकला. यापूर्वी प्रस्ताव क्रीडा महासंघ किंवा एसएआय (भारतीय क्रीडा प्राधिकरण) यांच्या माध्यमातून येत होते आणि प्रस्ताव सादरीकरणातही मोठा विलंब होत असे. काही वेळा तर एखादा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधीही लागत असे. रोख पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव योग्य वेळेत सादर होऊन त्यानंतरची मंजुरी वेळेवर मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी, आता विशिष्ट क्रीडास्पर्धा संपण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्जदाराने केवळ ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, प्रक्रियेचा कालावधी कमी करण्यासाठी सर्व तिन्ही योजनांसाठीचा पडताळणीची प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. प्रशिक्षकांना त्यांचा रोख पुरस्कार वेळेत मिळावा, याची सुनिश्चिती करण्यासाठी, योजनेत आवश्यक ते बदल केले आहेत. डीफेलिंपिक्समधील क्रीडापटूंनाही आता निवृत्तीवेतन योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. या योजनांमध्ये वरील लाभ देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी, क्रीडा विभागाच्या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी क्रीडापटुंना वरील सुविधांसाठी अर्ज करता येईल.

क्रीडा विभागाने dbtyas-sports.gov.in हे संकेतस्थळ सुरू केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की, क्रीडापटूंकडून आलेल्या अर्जांची पडताळणी हे ऑनलाईन संकेतस्थळ त्वरित करण्यासाठी सुविधाजनक आहे आणि प्रमाणीकरणासाठी वन टाईम पासवर्ड देऊन त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल. आता खेळाडूंना  मंत्रालयात प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करण्याची  आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. डीबीटी-एमआयएस याच्याशी संकेतस्थळ जोडले गेले असून भारत सरकारच्या डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाचे मिशनचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्रीडापटुंना त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला जाईल.

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे असेही सांगितले की, विभागाला आलेल्या सर्व अर्जांवर कालबद्धरित्या निर्णय घेण्यातच संकेतस्थळ मदत करणार नाही तर क्रीडापटुंचे विविध प्रकारचे आवश्यक अहवाल आणि विदा व्यवस्थापन करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जाईल. वेळोवेळी क्रीडापटुंच्या आवश्यकतांनुसार आणि प्रचलित परिस्थिती पाहून ऑनलाईन संकेतस्थळात सुधारणा केली जाईल.

केंद्रीय मंत्री ठाकूर  यांनी विभागाने समर्पित परस्परसंवादात्मक संकेतस्थळ nsdf.yas.gov.in  (नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड) हेही सुरू केले असल्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम, खासगी कंपन्या आणि व्यक्ती यांच्याकडून सीएसआर अंतर्गत देण्यात येत असलेल्या मदतीवर हा निधी आधारित असून देशातील क्रीडा क्षेत्राला चालना आणि विकास करण्यासाठी तो आहे. केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली की, व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्या आता खेळाडू, क्रीडा केंद्रे आणि क्रीडा स्पर्धा यांना एनएसडीएफ निधीच्या मार्फत थेट योगदान देऊ शकतील. एनएसडीएफ निधी टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टीओपी) योजना, प्रसिद्ध खेळाडूंकडून तसेच क्रीडासंघटनांकडून पायाभूत सुविधांचा विकासाकरता वापरला जाईल. हे समर्पित संकेतस्थळ केवळ क्रीडापटुच नव्हे तर सीएसआरमधून मदत देऊ इच्छिणाऱ्यांनाही सहज आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होईल. एनएसडीएफ देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत यशस्वी होण्यासाठी हे संकेतस्थळ मदत करेल, असे ठाकूर यांनी सांगितले.


* * *

S.Thakur/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840106) Visitor Counter : 267