आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 198.51 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
12 ते 14 वयोगटातील 3.72 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,22,335
गेल्या 24 तासात 18,815 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.51%,
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.09%
Posted On:
08 JUL 2022 9:46AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.51 (1,98,51,77,962) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,59,95,556 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.72 (3,72,96,754) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,09,413
|
2nd Dose
|
1,00,70,449
|
Precaution Dose
|
58,17,558
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,25,191
|
2nd Dose
|
1,76,34,698
|
Precaution Dose
|
1,07,16,428
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,72,96,754
|
2nd Dose
|
2,47,85,475
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,06,38,098
|
2nd Dose
|
4,94,28,712
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,84,99,598
|
2nd Dose
|
50,33,99,564
|
Precaution Dose
|
36,91,925
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,34,88,077
|
2nd Dose
|
19,39,09,277
|
Precaution Dose
|
29,23,347
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,72,99,188
|
2nd Dose
|
12,11,43,560
|
Precaution Dose
|
2,56,00,650
|
Precaution Dose
|
4,87,49,908
|
Total
|
1,98,51,77,962
|
भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,22,335 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.28% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.51% झाला आहे.
गेल्या 24 तासांत 15,899 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,29,37,876 झाली आहे.
गेल्या 24 तासात 18,815 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 3,79,470 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.57 (86,57,23,159) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.09% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.96% आहे.
***
S.Thakur/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840026)
Visitor Counter : 221