आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुषमान भारत डिजिटल मिशन या आपल्या प्रमुख योजनेंतर्गत एक लाखांहून अधिक सरकारी आणि खासगी आरोग्य सुविधांची नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात झाल्याचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून(एनएचए) जाहीर

Posted On: 06 JUL 2022 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2022

 

आयुषमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतून एक लाखांहून अधिक आरोग्य सुविधा केंद्रांची यशस्वी नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात(HFR) झाली आहे.  हा ऐतिहासिक मैलाचा दगड गाठल्यामुळे, डिजिटल आरोग्य मंचाचा अधिक व्यापक स्वीकार आणि सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे राबवली जाणारी एबीडीएम ही सरकारची प्रमुख योजना आहे. आरोग्य नोंदणी अभिलेखागार हा देशभरातील आधुनिकपासून ते पारंपरिक औषध प्रणालीपर्यंतचा आरोग्य सुविधांचा  एबीडीएमअंतर्गत उभारण्यात आलेला सर्वसमावेशक कोष आहे. त्यात सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही सुविधांचा समावेश असून रूग्णालये, क्लिनिक्स, रोगनिदानात्मक प्रयोगशाळा आणि स्कॅनिंग केंद्रांचा अंतर्भाव आहे.

डिजिटल आरोग्य सुविधा परिसंस्थेत संगणकाच्या सहाय्याने माहितीची देवाणघेवाण करण्याची सुविधा (इंटरऑपरेटिबिलिटी) शक्य होईल, अशा पद्धतीने निरंतर ऑनलाईन मंच तयार करण्याचा एबीडीएमचा उद्देश  आहे. आरोग्य केंद्रे, रूग्ण आणि आरोग्यसुविधा व्यावसायिक अशा सर्व भागधारकांसाठी निरंतर आरोग्य सुविधेचा अनुभव देण्याच्या दृष्टीने, एबीडीएमने प्राथमिक युनिट आणि आंतरसंचालित अप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस(एपीआय) विकसित केले आहेत. यापैकी एक प्रमुख प्राथमिक युनिट आरोग्य सुविधा नोंदणी हे आहे.

आरोग्य सुविधा नोंदणीचे महत्व स्पष्ट करून सांगताना आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर एस शर्मा म्हणाले की, देशातील नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सुविधा केंद्रांची रूग्णांना सहजतेने विस्तृत माहिती मिळेल, यासाठी विश्वासार्ह राष्ट्रीय मंच तयार करणे हा आमचा उद्देश  आहे. राष्ट्रीय  अभिलेखागारात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य केंद्रांनी, जे आता या कोषाचे भाग बनले आहेतघेतलेला उत्साहपूर्वक सहभाग आम्ही पाहिला आहे. देशातील अलोपथी, आयुर्वेद, दंतचिकित्सा, होमिओपथी, फिजीओथेरपी, युनानी, सिदध किंवा सोवा रिग्पा या विविध औषधांच्या पद्धतींसाठीच्या नोंदणीकृत आरोग्य सुविधा केंद्रांचा शोध  रूग्ण एबीडीएम नेटवर्कच्या माध्यमातून  सहज घेऊ शकतील. त्याचप्रमाणे, डॉक्टर्सपरिचारिका आणि निमवैद्यकीय  व्यावसायिक यांच्यासाठी रूग्ण आणि आरोग्य सुविधा व्यावसायिकांचे एबीएचए क्रमांक आमच्याकडे आहेत. या   अभिलेखागारामुळे सर्वांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा सहज मिळेल.

आरोग्य अभिलेखागारासाठी नोंदणी केल्यावर एका विश्वासार्ह राष्ट्रीय मंचावर आरोग्य केंद्रांची सूची तयार करणे शक्य होईल आणि भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी एबीडीएमच्या सॉफ्टवेअर सोल्युशन्सच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांना सक्षम करेल. लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या  एकत्रित आरोग्य इंटरफेसच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांसाठी नागरिक करत  असलेल्या शोधात सुधारणा होणार आहे.   आरोग्य केंद्रांची नोंदणी https://facility.abdm.gov.in/ किंवा आरोग्य तंत्रज्ञान कंपन्यांसारख्या संकलकाच्या  माध्यमातून नोंदणी करता येईल.

पडताळणी केलेल्या आरोग्य केंद्रांपैकी 97 टक्के केंद्रे ही सरकारी क्षेत्रातील आहेत. सत्यापित केंद्रांपैकी सर्वोच्च संख्येने केंद्रे ही उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि आसामात आहेत. एचएफआर अंतर्गत स्वामित्वहक्कावर आधारित (सार्वजनिक किंवा खासगी), सत्यापित आणि नोंदणीकृत आरोग्य केंद्रांचा तपशील औषधांची प्रणाली आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय कामगिरी एबीडीएमच्या सार्वजनिक कळफलकावर https://dashboard.abdm.gov.in/abdm/ वर आहे. या कळफलकावर राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीकोषाची  दैनंदिन, मासिक आणि एकत्रित प्रगतीचे कल तक्त्यातून दाखवले जातात.

नोंदणी अभिलेखागारातील प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक विशिष्ट ओळखकर्ता असून एबडीएम परिसंस्थेत प्रतिचित्रणासाठी  त्याचा उपयोग केला जातो. तसेच देशातील सर्व सार्वजनिक आणि खासगी आरोग्य केंद्रांची सर्वसमावेशक माहिती पुरवली जाते. हा एकमेव ओळखकर्ता इतर संस्थांकडूनही (परवानगीने) एबीडीएम सॉफ्टवेअर सोल्युशन्ससारख्या सुविधांचा वापर करून केंद्र निश्चित करून आवश्यक सुविधा केंद्राची माहिती आवश्यक उद्दिष्टांसाठी परत मिळवून वापर करू शकतो.

S.Kulkarni /U.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1839696) Visitor Counter : 191