पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 4 जुलैला भीमावरम आणि गांधीनगरला भेट देणार
भीमावरम, आंध्रप्रदेशमध्ये प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीच्या वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
आलुरी सीताराम राजू यांच्या 30 फुटी कांस्यपुतळ्याचे पंतप्रधान करणार अनावरण
गांधीनगरमध्ये पंतप्रधांनांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन
डिजिटल इंडियासाठी संकल्पना आहे- नवीन भारताच्या तंत्रज्ञानाच्या दशकाला उत्प्रेरक बनवणे
‘डिजिटल इंडिया भाषिणी’, ‘डिजिटल इंडिया जेनेसिस’ आणि इंडिया स्टॅक ग्लोबल यांचे उद्घाटन पंतप्रधान करणार, तसेच ‘माय स्किम’ आणि ‘मेरी पहचान’ राष्ट्राला समर्पित करणार
चिप्स टु स्टार्ट अप कार्यक्रमांतर्गत समर्थन करण्यात येणाऱ्या 30 संस्थांच्या समूहांची घोषणा पंतप्रधान करणार
Posted On:
01 JUL 2022 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलै 2022 रोजी आंध्रप्रदेशातील भीमावरम आणि गुजरातेतील गांधीनगर येथे भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी 4-30 वाजता पंतप्रधान गांधीनगर येथे डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन करतील.
भीमावरममध्ये पंतप्रधान
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची न्याय्य दखल घेऊन त्यांच्याबद्दल देशभरातील लोकांना जागृत करण्याबद्दल कटीबद्ध आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान आलुरी सीताराम राजू यांच्या 30 फुटी कांस्यपुतळ्याचे अनावरणही करतील.
4 जुलै 1897 रोजी जन्मलेले अलुरी सीतारामा राजू यांचे स्मरण पूर्व घाटांतील आदिवासी जमातीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरोधात दिलेल्या लढ्यासाठी केले जाते. 1922 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राम्पा बंडांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांचा उल्लेख स्थानिकांकडून मन्यम वीराडु (जंगलांचा नायक) म्हणून केला जातो.
जयंतीनिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचा भाग म्हणून सरकारने अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आलुरी सीताराम राजू यांचे जन्मगाव विजयनगर जिल्ह्यातील पांडरंगी आणि राम्पा बंडाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिंतापल्ली पोलिस ठाणे (याच ठाण्यावर हल्ल्याने राम्पा बंडाची सुरूवात झाली होती) पुनर्प्रस्थापित केले जाईल. सरकारने मोगाल्लु येथे अलुरी ध्यान मंदिरांचे बांधकाम करण्यास तसेच अलुरी सीतारामा राजू यांचा ध्यानमुद्रेतील पुतळाही उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच तेथे भित्तीचित्रे आणि एआय प्रणाली द्वारे स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्याची कथा चितारली जाईल.
पंतप्रधान गांधीनगरमध्ये
पंतप्रधान गांधीनगर येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन करणार असून त्याची संकल्पना नवीन भारताच्या तंत्रज्ञान दशकाला उत्प्रेरक बनवणे ही आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान अनेक डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन करणार असून तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता, जीवन सुखमय करण्यासाठी सेवा वितरण सुनियोजित करणे आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याचा या सप्ताहाचा उद्देष्य आहे.
पंतप्रधान 'डिजिटल इंडिया भाषिणीची' सुरूवात करणार असून भारतीय भाषांमध्ये इंटरनेट आणि डिजिटल सेवांची सहज उपलब्धता त्यामुळे शक्य होणार आहे, ज्यात ध्वनीवर आधारित सहज प्रवेश तसेच भारतीय भाषांमध्ये आशयाची निर्मिती करण्यास मदत यांचा समावेश आहे. भारतीय भाषांसाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषा तंत्रज्ञान उभारण्यासाठी प्रमुख हस्तक्षेप हा बहुभाषक डेटाबेस तयार करणे हा असेल. डिजिटल इंडिया भाषिणीमुळे भाषादान या क्राऊड सोर्सिंग उपक्रमाद्वारे लोकांचा हे डेटा संच उभारण्यात व्यापक सहभाग शक्य होणार आहे.
पंतप्रधान डिजिटल इंडिया जेनेसिस (जनरेशन नेक्स्ट सपोर्ट फॉर इन्नोव्हेटिव्ह स्टार्ट अप्स) –सखोल तंत्रज्ञानावर आधारित राष्ट्रीय स्टार्ट अप मंचाचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या स्तर दोन आणि स्तर तीन शहरांमध्ये स्टार्ट अप शोधणे, त्यांना समर्थन देणे, त्यांचा विकास आणि त्यांना यशस्वी बनवणे त्यासाठी हा मंच काम करेल. या योजनेसाठी एकूण 750 कोटी रूपयांचा निधी राखून ठेवला आहे.
पंतप्रधान Indiastack.global या प्रमुख प्रकल्पांच्या जागतिक कोषाचेही उद्घाटन करतील. इंडिया स्टॅक अंतर्गत आधार, यूपीआय, डिजीलॉकर, कोविन लसीकरण मंच, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM), दीक्षा मंच आणि आयुषमान भारत डिजिटल हेल्थ मिशन हे प्रमुख प्रकल्प भारतात अमलात आले असून त्यांचा समावेश या कोषात आहे. ग्लोबल पब्लिक डिजिटल गुड्स कोषात भारताच्या या प्रस्तावामुळे भारताला लोकसंख्या स्केलवर डिजिटल संक्रमण प्रकल्प उभारण्यात आघाडीचा नेता म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. अशा तांत्रिक उपाययोजनेकडे उत्सुकतेने पहाणार्या इतर देशांनाही याची आत्यंतिक मदत होणार आहे.
पंतप्रधान MyScheme हा सरकारी योजनांपर्यंत नागरिकांना सहजप्रवेश शक्य करणारा सेवा वितरण मंच नागरिकांना समर्पित करतील. ज्या योजनांसाठी वापरकर्ते पात्र आहेत, त्या योजनांची माहिती असलेल्या संकेतस्थळांचा एक थांबा शोध घेणे नागरिकांन शक्य व्हावे, असा या योजनेचा उद्देष्य आहे. Meri Pehchan चे ही नागरिकांना समर्पण करतील. ही एक नॅशनल सिंगल साईन ऑन फॉर वन सिटीझन लॉगिन उपक्रम हा वापरकर्त्याला प्रमाणीकरण सेवा असून ज्यात एकच ओळखपत्रांच्या संचाद्वारे अनेक ऑनलाईन सेवा किंवा अर्ज उपलब्ध होतील.
चिप्स टु स्टार्ट अप कार्यक्रमांतर्गत ज्या 30 संस्थांना समर्थन देण्यात येणार आहे, त्या संस्थांच्या पहिल्या समूहाचीही घोषणा पंतप्रधान करणार आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन स्तरावर सेमीकंडक्टर चिप विकसित करण्याच्या क्षेत्रात C2S कार्यक्रम हा विशेष मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याचा असून देशात सेमीकंडक्टर रचनेत गुंतलेल्या स्टार्ट अप्सच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. या संस्थांना संघटना स्तरावर मार्गदर्शन आणि स्टेट ऑफ द आर्ट सुविधा उपलब्ध करण्याचा त्यात समावेश आहे. सेमीकंडक्टर्समध्ये मजबूत परिसंस्था तयार करण्यासाठी भारत सेमीकंडक्टर मोहिमेचाच हा भाग आहे.
डिजिटल इंडिया सप्ताह 2022 4 जुलै ते 6 जुलै दरम्यान गांधीनगरमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रम होतील. डिजिटल इंडियाची जयंती साजरी केली जाईल आणि आधार, यूपीआय, कोविन, डिजीलॉकर आदी सार्वजनिक डिजिटल मंचांमुळे नागरिकांचे जीवनमान सुखमय झाले आहे, याचे प्रदर्शन केले जाईल. त्यातून जागतिक प्रेक्षकांना भारताच्या प्रचंड तांत्रिक कौशल्याचे त्यात प्रदर्शन केले जाईल, तसेच व्यापक प्रमाणावरील भागधारकांकडून सहकार्य आणि व्यावसायिक संधींची शक्यता पडताळून पाहिली जाईल आणि पुढील पिढीसाठी तंत्रज्ञानाच्या संधी प्रदान केल्या जातील. त्यात स्टार्ट अप्स आणि सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य लोकांचा सहभाग असेल. डिजिटल मेळा आयोजित करण्यात आला असून त्यात लोकांचे जीवन सुखमय करण्यासाठी डिजिटल उपाययोजनांचे प्रदर्शन करणारे 200 स्टॉल्स त्यात असतील. त्यात भारतीय स्टार्ट अप्स आणि युनिकॉर्न्सनी विकसित केलेले तांत्रिक उपायही त्यात असतील. डिजिटल इंडिया सप्ताहात 7 ते 9 जुलै दरम्यान इंडिया स्टॅक ज्ञान आदानप्रदान आभासी पद्धतीने केले जाईल.
* * *
S.Thakur/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838514)
Visitor Counter : 193
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam