वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्यांच्या स्टार्ट अप क्रमवारीची 4 जुलै रोजी होणार घोषणा


गेल्या 6 वर्षात, स्टार्ट अप धोरण असलेली राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्या संख्येत वाढ, ही संख्या 4 वरून 30 वर, त्यापैकी 29 राज्यांची स्टार्ट अप पोर्टल

Posted On: 01 JUL 2022 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022


स्टार्ट अप व्यवस्थेला पाठबळ देण्यासंदर्भातल्या क्रमवारीच्या तिसऱ्या भागाचे निकाल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्रोद्योगमंत्री पियुष गोयल  4 जुलै 2022 रोजी नवी दिल्लीत एका पुरस्कार कार्यक्रमात जाहीर करणार आहेत. भारताच्या स्पर्धात्मकता आणि सहकारी संघवादाच्या दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्ट अप क्रमवारीच्या तिसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलं होतं. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्टार्ट अप्स उद्योगांचा विकास करण्यासाठी नियम शिथिल करावेत आणि स्टार्ट अप व्यवस्थेला बळकटी द्यावी या उद्देशाने 2018 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

या वर्षी या उपक्रमामध्ये एकूण 24 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या 25 च्या तुलनेत या संख्येत या वर्षी वाढ झाली आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असून  त्यापैकी 29 राज्यांची स्वतःचे स्टार्ट अप पोर्टल ही आहेत. 2016 मध्ये स्टार्ट अप धोरण असलेली केवळ 4 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश होते.

यावेळी आयोजित केलेल्या फेरीमध्ये स्टार्ट अप्स 26 कृती मुद्यांसह स्टार्ट अप्सना आणि या पूरक प्रणालीतील हितधारकांना नियामक, धोरणविषयक आणि आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी अत्यावश्यक असलेली 7 प्रमुख सुधारणा क्षेत्रे होती.

तिसऱ्या भागामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 1 ऑक्टोबर 2019 ते 31 जुलै 2021 दरम्यान पुरवलेल्या पाठबळाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यांनी या संदर्भात सादर केलेल्या सामग्रीचे सुमारे 6 महिने मूल्यमापन करण्यात आले आणि 7200 पेक्षा जास्त लाभार्थ्यांकडून 13 भाषांमध्ये अभिप्राय संकलित करण्यात आले.


* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838501) Visitor Counter : 225