पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला
केंद्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही
Posted On:
30 JUN 2022 3:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याशी यांच्याशी संवाद साधून भूस्खलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.
"मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंगजी यांच्याशी बोलून दुर्दैवी अशा भूस्खलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत पुरवली जाईल. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा, अशी मी प्रार्थना करतो."
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838257)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam