आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 197.61 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.66 कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना दिली लसीची पहिली मात्रा

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,04,555

गेल्या 24 तासात 18,819 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.55%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.72%

Posted On: 30 JUN 2022 9:43AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 197.61 (1,97,61,91,554) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,57,19,005 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.66 (3,66,66,548) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,940

2nd Dose

1,00,65,670

Precaution Dose

56,98,268

FLWs

1st Dose

1,84,23,903

2nd Dose

1,76,26,198

Precaution Dose

1,02,61,333

Age Group 12-14 years

1st Dose

3,66,66,548

2nd Dose

2,34,21,049

Age Group 15-18 years

1st Dose

6,04,32,621

2nd Dose

4,87,75,997

Age Group 18-44 years

1st Dose

55,82,52,205

2nd Dose

50,13,99,508

Precaution Dose

29,16,874

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,46,086

2nd Dose

19,34,61,532

Precaution Dose

25,54,148

Over 60 years

1st Dose

12,72,58,069

2nd Dose

12,08,35,500

Precaution Dose

2,42,87,105

Precaution Dose

4,57,17,728

Total

1,97,61,91,554

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या 1,04,555 इतका आहे, तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.24% इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.55% आहे. गेल्या 24 तासांत 13,827 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,28,22,493 झाली आहे.

गेल्या 24 तासात 18,819 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,52,430 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.23 (86,23,75,489) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.72% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.16% आहे.

***

S.Thakur/B. Sontakke/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838157) Visitor Counter : 156