वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वित्तमंत्री निर्मला सीतारामन उद्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत व्यवसाय सुधारणा कृती आराखड्याच्या  (BRAP 2020) अंमलबजावणीवर आधारित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध करणार

Posted On: 29 JUN 2022 4:20PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन गुरुवार, 30 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे  वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक,अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत व्यवसाय सुधारणा कृती आराखडा  (BRAP), 2020 अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध करतील.

व्यवसाय सुधारणा कृती आराखडा (BRAP 2020)  मध्ये 301 सुधारणा विषयक मुद्द्यांचा समावेश आहेज्यात 15 व्यवसाय नियामक क्षेत्रांचा समावेश आहे. उदा.  माहिती उपलब्धता ,एक खिडकी प्रणालीकामगार, पर्यावरण, क्षेत्रीय सुधारणा आणि व्यवसाय संबंधी  इतर सुधारणा यांचा यात समावेश आहे.

व्यवसाय सुधारणा कृती आराखडा  2020 मध्ये प्रथमच क्षेत्रीय सुधारणा सादर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये व्यापार परवाना, आरोग्यसेवा, कायदेशीर मापनशास्त्र, चित्रपटगृहे आदरातिथ्यफायर एनओसी, दूरसंचार , चित्रपटांचे चित्रीकरण आणि पर्यटन या 9 क्षेत्रांमधील  72 सुधारणा आहेत.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग 2014 पासून, देशभरात गुंतवणूकदार-स्नेही परिसंस्था निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुधारणांना चालना देण्यासाठी  व्यवसाय सुधारणा कृती आराखडा  (BRAP) प्रसिद्ध करत आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मूल्यांकनाच्या आतापर्यंत 4 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि नवीन आवृत्ती 2020 च्या मूल्यांकनाशी संबंधित  आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837919) Visitor Counter : 169